महाराष्ट्र

maharashtra

अल्पवयीन मुलीवर ऑनलाईन गेममध्ये बलात्कार! पोलिसांकडून गुन्हा दाखल

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 6:03 PM IST

Rape In Online Game : ब्रिटनमध्ये एका मुलीच्या व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी (VR) अवतारवर ऑनलाईन गेममध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Rape In Online Game
Rape In Online Game

हैदराबाद Rape In Online Game : एका अल्पवयीन मुलीवर व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी गेममध्ये सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी ब्रिटीश पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आलाय. मेटाव्हर्समध्ये घडलेली ही अशा प्रकारची पहिली घटना असल्याचं बोललं जातंय.

पीडितेवर भावनिक आणि मानसिक आघात : अहवालानुसार, 16 वर्षांची कथित पीडित मुलगी एका इमर्सिव्ह गेममध्ये व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी हेडसेट घालून खेळत होती. या दरम्यान तिच्या अ‍ॅनिमेटेड अवतारावर अनेक पुरुषांनी बलात्कार केला. यामध्ये या मुलीला कोणतीही शारीरिक दुखापत झाली नाही. परंतु तिला वास्तविक जीवनात बलात्कार झालेल्या एखाद्या व्यक्तीप्रमाणेच आघात झाला असावा, असं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. "यामुळे पीडित व्यक्तीवर भावनिक आणि मानसिक प्रभाव पडतो, जो कोणत्याही शारीरिक दुखापतीपेक्षा दीर्घकालीन असतो," असं प्रकरणाचा तपास करत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.

खटला चालवणं अशक्य : ब्रिटीश अधिकार्‍यांच्या मते, यावर विद्यमान कायद्यांनुसार खटला चालवणं अशक्य आहे. विद्यमान कायदे लैंगिक अत्याचाराला, संमतीशिवाय केलेला 'शारीरिक स्पर्श' म्हणून परिभाषित करतं. पोलिसांनी तपास केलेला हा पहिलाच आभासी लैंगिक गुन्हा असल्याचं मानलं जातंय. मात्र शारीरिक बलात्काराच्या अनेक घटना घडत असताना, पोलिसांनी मेटाव्हर्स गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी वेळ आणि मर्यादित संसाधनं वापरावीत का, असे प्रश्न यामुळे उपस्थित झाले आहेत.

कायदे तयार नाहीत : या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, किशोरवयीन मुलीनं शारीरिक बलात्कार झालेल्या व्यक्तीप्रमाणेच मानसिक आघात अनुभवला होता. मात्र सध्याचे कायदे यासाठी तयार केले नसल्यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अनेक आव्हानं आहेत. या प्रकरणावर होम सेक्रेटरी जेम्स यांनीही प्रतिक्रिया दिली. व्हिडिओ गेममध्ये एखाद्यावर बलात्कार करण्यास इच्छुक असलेली व्यक्ती, खऱ्या आयुष्यातही अशा भयानक गोष्टी करू शकते, असं ते म्हणाले. याप्रकरणी मेटातर्फे अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

हे वाचलंत का :

  1. भारतात 71 लाखांहून अधिक व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बंद; करू नका 'या' चुका
  2. माणुसकीचा अंत! अल्पवयीन मुलीवर 13 जणांचा सामूहिक बलात्कार
  3. लग्नाच्या बहाण्यानं मुंबईतील महिलेवर राजस्थानात सामूहिक बलात्कार

ABOUT THE AUTHOR

...view details