हैदराबादAditya L1 Sends Image : इस्रोची सूर्य मोहीम आदित्य-एल वन चा प्रवास (आदित्य-एल1) उत्तम सुरू आहे. हे सांगण्यासाठी त्याने आपला सेल्फी आपल्यासाठी पाठवला आहे. त्याचे सर्व कॅमेरे व्यवस्थित काम करत असल्याचंही सांगण्यात आलं आहे. त्याने पृथ्वी आणि चंद्राची छायाचित्रेही घेतली आहेत. तसंच व्हिडिओ बनवला आहे. इस्रोने एक्सवर त्याच्या पोस्ट टाकल्या आहेत. आदित्य-एल1 18 सप्टेंबरपर्यंत पृथ्वीभोवती चारवेळा आपली कक्षा बदलेल. 10 सप्टेंबरच्या रात्री ते पुढील कक्षेतील झेप घेईल. एकदा आदित्य L1 त्याच्या उद्देश स्थळी पोहोचले की ते दररोज 1440 फोटो पाठवेल. जेणेकरून सूर्याचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास करता येईल. आदित्यमध्ये स्थापित कोरोनाग्राफ (VELC)द्वारे ही छायाचित्रे घेतली जातील.
आदित्यवरील सर्व उपकरणे सुस्थितीत : शास्त्रज्ञांच्या मते फेब्रुवारीमध्ये पहिले चित्र मिळेल. VELC ची निर्मिती भारतीय खगोल भौतिकी संस्थेनं केली आहे. इस्रोच्या सूर्य मोहिमेत गुंतलेली VELC सूर्याचे HD फोटो घेईल. पृथ्वीभोवतीची कक्षा बदलली जात आहे जेणेकरून ती एवढा वेग मिळवू शकेल की ती 15 लाख किमीचा प्रवास पूर्ण करू शकेल. L1 पर्यंतचा प्रवास पूर्ण केल्यानंतर आदित्यवरील सर्व उपकरणे चालू होतील. म्हणजे त्यात बसवलेली सर्व उपकरणे सक्रिय होतील. त्यातून सूर्याचा अभ्यास सुरू होईल. ही उपकरणे सुस्थितीत आहेत की नाही ते पाहण्यासठी ती वेळोवेळी सक्रिय केली जाऊ शकतात.
लॅरेंज पॉइंट :इस्रोच्या शास्त्रज्ञांनी पाच वर्षांसाठी आदित्य-एल1 मिशन तयार केले आहे. परंतु जर ते सुरक्षित राहिले तर ते 10-15 वर्षे काम करू शकते. सूर्याशी संबंधित डेटा पाठवू शकते. पण यासाठी आधी L1 हा बिंदू गाठणे आवश्यक आहे. लॅरेंज पॉइंट हे अंतराळातील असे ठिकाण आहे जे पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये सरळ रेषेत आहे. पृथ्वीपासून त्याचे अंतर 1.5 दशलक्ष किलोमीटर आहे. सूर्य आणि पृथ्वीचे स्वतःचे गुरुत्वाकर्षण आहे. या दोघांचे गुरुत्वाकर्षण L1 बिंदूवर विसर्जित किंवा शून्य होते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव कुठे संपतो तिथून सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव सुरू होतो. याच्यामधील बिंदुला लॅरेंज पॉइंट म्हणतात.