ETV Bharat / science-and-technology

Chandrayaan 3 update : विक्रमने पुन्हा चंद्रावर मारली 40 सेमी उंच उडी; केलं सॉफ्ट लँडिंग - इस्रो

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2023, 4:23 PM IST

Chandrayaan 3 update : इस्रोनं चंद्रयान ३ बाबत मोठी माहिती दिली आहे. विक्रम लँडरनं चंद्रयान ३ मोहिमेचं उद्दिष्ट पूर्ण केल्याचं इस्रोने म्हटलं आहे. त्याने त्याचा हॉपचा प्रयोग यशस्वीपणे पूर्ण केला आहे. इस्रोने सांगितलं की, विक्रम लँडरने दुसऱ्यांदा उडी मारून चंद्रावर यशस्वी लँडिंग केलं आहे.

Chandrayaan 3 update
विक्रमने पुन्हा चंद्रावर मारली 40 सेमी उंचीवर उडी

हैदराबाद Chandrayaan 3 update : भारताच्या चंद्रयान-3 ने चंद्रावरून आणखी एक आनंदाची बातमी पाठवली आहे. विक्रम लँडरने केवळ चंद्रावर उडी मारली नाही तर दुसऱ्यांदा यशस्वी लँडिंगही केलं आहे. भारताच्या चंद्रयान ३ मोहिमेनं पुन्हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग आणि हॉपचा प्रयोग पूर्ण केला आहे. असं करून इस्रोने एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ही यशस्वी कामगिरी इस्रोच्या भविष्यातील मोहिमांच्या पुनरागमनासाठी चांगली बातमी आहे. या मिशनने भारताचा तांत्रिक पराक्रम आणि वैज्ञानिक क्षमता दाखवून दिली आहे. इस्रोच्या म्हणण्यानुसार अंतराळ यानाने फक्त 40 सेमी उंचीवर उडी मारली आणि 30 ते 40 सेंटीमीटरच्या दरम्यान पुन्हा सॉफ्ट लँड केलं. अशाप्रकारे विक्रम लँडरने नियोजित उद्दिष्टं ओलांडली आहेत. किक-स्टार्ट क्षमतेचा इस्रोच्या भविष्यातील परतीच्या मोहिमांना तसंच क्रूच्या अवकाश उड्डाणांना फायदा होईल.

  • Chandrayaan-3 Mission:
    🇮🇳Vikram soft-landed on 🌖, again!

    Vikram Lander exceeded its mission objectives. It successfully underwent a hop experiment.

    On command, it fired the engines, elevated itself by about 40 cm as expected and landed safely at a distance of 30 – 40 cm away.… pic.twitter.com/T63t3MVUvI

    — ISRO (@isro) September 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

इस्रोने केली सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट : इस्रोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये म्हटलं आहे, हा हॉप प्रयोग यशस्वीरित्या पार पडलाय. त्याची इंजिने सुरू झाली आणि अपेक्षेप्रमाणे त्याने स्वतःला सुमारे 40 सेमी उंचीवर उडवले आणि 30 ते 40 सेमी अंतरावर परत चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवले. त्याचं महत्त्व सांगताना, इस्रोने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, 'हे 'किक-स्टार्ट' भविष्यातील मोहिमा आणि मानवयुक्त मोहिमांना गती देणारं आहे. प्रयोगानंतर तैनात केलेले रॅम्प, CHASTE आणि ILSA मागे वळले आणि यशस्वीरित्या पुन्हा स्थापित करण्यात आले. 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान 3 मिशन ज्या ठिकाणी उतरले होते, त्या शिवशक्ती पॉईंटजवळ रात्र होण्यापूर्वी विक्रम देखील झोपवले जाईल. ग्राउंड चाचण्यांनी हे सिद्ध केलं आहे की लँडरवरील उपकरणे चंद्राच्या रात्री टिकून राहू शकतात. 22 सप्टेंबर 2023 रोजी जेव्हा सूर्य पुन्हा शिवशक्ती बिंदूतून उगवतो तेव्हा पुन्हा सौरपॅनेल सुरू होतील. अशा परिस्थितीत लँडर आणि रोव्हरची वैज्ञानिक ऑपरेशन सुरू राहतील.

उडी मारण्यापूर्वी रोव्हरचा रॅम्प बंद करण्यात आला होता : सध्या विक्रम लँडरचे सर्व भाग आणि उपकरणे व्यवस्थित काम करत आहेत. विक्रम लँडरचा रॅम्प, चेस्ट आणि आयएलएसए पेलोड उडी मारण्यापूर्वी बंद करण्यात आला. सॉफ्ट लँडिंगनंतर ते पुन्हा उघडण्यात आले आहे. याआधी चांद्रयान-३ च्या प्रज्ञान रोव्हरला चंद्रावरील अशा ठिकाणी आणून स्लीप मोडमध्ये ठेवण्यात आले आहे. जिथे सूर्य पुन्हा उगवल्यावर त्याला सौर ऊर्जा मिळेल, त्यानंतर ते पुन्हा सक्रिय होईल.

हेही वाचा :

  1. Politics on Chandrayaan ३ : 'आता अदानी चंद्रावर बांधणार फ्लॅट्स, शुद्ध शाकाहारींसाठीच मिळणार घरं'
  2. Chandrayaan 3 update : चंद्रावर भूकंप! इस्रोनं नोंदवलं 'कंपनं', प्लाझमाचा अभ्यास सुरू
  3. Chandrayaan ३ Rover : 'प्रज्ञान' रोव्हरचं चंद्रावरील कार्य पूर्ण, रोव्हर स्लीप मोडमध्ये सेट
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.