महाराष्ट्र

maharashtra

इन्स्टाग्रामच्या वापरकर्त्यांना लाईव्ह व्हिडिओसह रील्समध्ये दिसणार 'इनसाईट'

By

Published : May 26, 2021, 3:48 PM IST

इन्स्टाग्रामच्या व्हिडिओमधील इनसाईट पेजमधील आकडेवारीवरून किती दर्शकांनी कॉमेंट, लाईक, प्ले आणि सेव्ह केले याची माहिती समजू शकणार आहे. लाईव्ह व्हिडिओमध्ये कॉमेंट आणि शेअरची आकडेवारी दिसणार आहे.

इन्स्टाग्राम
इन्स्टाग्राम

सॅनफ्रान्सिस्को- फेसबुकची मालकी असलेल्या इन्स्टाग्रामने नवीन फीचर लाँच केले आहे. या फीचरमुळे अँड्राईडवरील इन्स्टाग्रामच्या वापरकर्त्यांनी लाईव्ह व्हिडिओ आणि रील्स किती लोकांना पाहिला याची इनसाईटमधून माहिती समजणार आहे.

इन्स्टाग्रामच्या व्हिडिओमधील इनसाईट पेजमधील आकडेवारीवरून किती दर्शकांनी कॉमेंट, लाईक, प्ले आणि सेव्ह केले याची माहिती समजू शकणार आहे. लाईव्ह व्हिडिओमध्ये कॉमेंट आणि शेअरची आकडेवारी दिसणार आहे. इन्स्टाग्रामच्या नवीन अपडेट इनसाईड पेजमध्ये महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. रीच सेक्शनमध्ये फॉलोअर आणि नॉन फॉलोअर अशी वर्गवारी देण्यात आलेली आहे.

हेही वाचा-'या' कंपनीच्या कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला तर निवृत्तीपर्यंत कुटुंबाला मिळणार वेतन

क्रियटरला ऑनलाईन कामगिरीची माहिती कळू शकणार-

कंटेन्टची रँकिंग आणि कशा प्रकारच्या अकाउंटपर्यंत व्हिडिओ पोहोचली याची आकडेवारी कळाल्याने वापरकर्त्यांना प्रभावीपणाने दर्शकांची माहिती समजणार आहे. या फीचरमुळे क्रियटरला ऑनलाईन कामगिरीची माहितीही चांगल्या पद्धतीने समजू शकणार आहे. येत्या काही महिन्यांत इन्स्टाग्राम नवीन प्रिसेट टाईम फ्रेम ऑप्शनचा पर्याय उपलब्ध करणार आहे.

हेही वाचा-कोव्हॅक्सिनला जुलै ते सप्टेंबरमध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळणार मंजुरी-भारत बायोटेक

ABOUT THE AUTHOR

...view details