महाराष्ट्र

maharashtra

Shubhman Gill on Pakistan Pace Attack : पाकिस्तानी गोलंदाजीवर आपण का अडखळतो? शुभमन गिलनं सांगितलं धक्कादायक कारण

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 10:56 PM IST

Shubhman Gill on Pakistan Pace Attack : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार युवा फलंदाज शुभमन गिलनं आशिया चषकातील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी एक मोठं विधान केलय. भारतीय फलंदाजांना पाकिस्तानच्या वेगवान त्रिकुटाचा सामना करण्याची सवय नसल्याने भारतीय फलंदाज पाकिस्तानी गोलंदाजीवर अडखळतात, असं त्याने म्हटलयं. तसंच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा खूप आदर करतो, असंही गिलनं म्हटलयं.

शुभमन गिलनं सांगितल धक्कादायक कारण
Shubhman Gill on Pakistan Pace Attack

कोलंबो Shubhman Gill on Pakistan Pace Attack :आशिया चषकाच्या (asia cup 2023) सुपर-४ फेरीतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार युवा फलंदाज शुभमन गिलनं एक विधान केलय. भारतीय फलंदाजांना पाकिस्तानच्या वेगवान त्रिकुटाचा सामना करण्याची सवय नाही. यामुळे भारतीय फलंदाज पाकिस्तानी गोलंदाजीवर अडखळतात, असं गिलनं म्हटलय. कोलंबो येथे उद्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सुपर-४ सामना रंगणार आहे. (india vs pakistan super 4)

पाकिस्तानचे गोलंदाज खूप वेगळे : रविवारी पाकिस्तानविरुद्ध (india vs pakistan) खेळल्या जाणाऱ्या सुपर स्टेज सामन्यापूर्वी गिल म्हणाला, आम्ही इतर संघांविरुद्ध जितके सामने खेळतो तितके पाकिस्तानविरुद्ध खेळत नाही. आफ्रिदीच्या आत येणा-या चेंडूंवर भारतीय आघाडीच्या फलंदाजांना अडचणीचा सामना करावा लागतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की, हे गोलंदाजी आक्रमण खूप चांगले आहे. जेव्हा आपण अशा गोलंदाजीविरुद्ध खेळत नाही तेव्हा मोठ्या स्पर्धांमध्ये थोडा फरक पडतो. भारत आणि पाकिस्तानचे संघ केवळ विश्वचषक आणि आशिया चषक यांसारख्या स्पर्धांमध्येच आमनेसामने येतात. शाहीनच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी डाव्या हाताच्या थ्रो-डाउन स्पेशालिस्ट विरुद्ध सराव केल्याचं गिलनं सांगितलं. गिल पुढे म्हणाला, 'पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज खूप वेगळे आहेत. त्यांची स्वतःची शैली आहे. शाहीन चेंडू खूप स्विंग करतो. नसीम शाह वेगावर लक्ष केंद्रित करतो आणि त्याला पिचकडून मदत मिळवायला आवडते. ते वेगवेगळ्या परिस्थितीत फलंदाजाला वेगवेगळी आव्हने देतात. गेल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही वर्चस्व गाजवावे लागेल, असंही गिल म्हणाला. पाकिस्तानविरुद्ध साखळी सामन्यात भारताने 66 रन्समध्ये चार विकेट गमावल्या होत्या. यावर गिल म्हणाला, 'सलामीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करून वर्चस्व गाजवायला हवे.'

बाबर आझमचा आदर करतो :रोहितसोबतची भागीदारी महत्त्वाची असल्याचे सांगताना गिल (Shubman Gill) म्हणाला, रोहित असा खेळाडू आहे की त्याला गोलंदाजांना हवेत खेळणे अधिक आवडते आणि मला पॉवर प्लेमध्ये ग्राउंड शॉट्स खेळायला आवडतात. ही खेळी आमच्यासाठी चांगले कार्य करते. शॉट सिलेक्शन आणि परिस्थिती हाताळण्याच्या बाबतीत आम्ही वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतो. त्यामुळे विरोधी संघाला आम्हाला रोखणे थोडे अवघड जाते. गेल्या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करूनही संघ कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली नसल्याचं गिलचं मत आहे. तो म्हणाला, 'वरिष्ठ स्तरावर पाकिस्तानविरुद्धचा हा माझा पहिला सामना होता. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा दबाव होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही अफगाणिस्तान, नेदरलँड्स, पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही संघाविरुद्ध खेळताना दबाव नेहमीच असतो. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा खूप आदर करतो, असंही गिल म्हणाला. तो म्हणाला, 'तुम्हाला त्याच्या फलंदाजीचं अनुकरण करायला नक्कीच आवडेल. तो इतकी चांगली फलंदाजी कशी करतो हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्याचे व्हिडिओ पहावे लागतील. तो जागतिक दर्जाचा खेळाडू असून आम्ही त्याचा खूप आदर करतो, असंही गिल म्हणाला.

हेही वाचा :

  1. Yo Yo Test : ना हार्दिक, ना विराट; टीम इंडियाच्या यो-यो टेस्ट मध्ये 'हा' खेळाडू अव्वल
  2. World Cup २०२३ : एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, जाणून घ्या कोणाची लागली लॉटरी, कोणाचा पत्ता कट झाला
  3. Indian Women Blind Cricket : भारतीय महिला अंध क्रिकेट संघानं वर्ल्ड गेम्समध्ये जिंकले सुवर्णपदक, पंतप्रधानांकडून कौतुक

ABOUT THE AUTHOR

...view details