महाराष्ट्र

maharashtra

Russia bans jet skis : रशियात विजयदिन समारोहावर संकट; प्रमुख शहरांमध्ये जेट स्की, राइड-हेलिंगवर बंदी

By

Published : May 9, 2023, 12:27 PM IST

रशियामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव 21 रशियन शहरांतील 9 मे ची लष्करी परेड रद्द केली आहे. रशियामध्ये प्रथमच विजय दिनाच्या उत्सवाचा मुख्य भाग असलेल्या या परेड रद्द केल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हे केले गेल्याचे सांगण्यात येत आहे.

रशियात विजयदिन समारोहावर संकट
रशियात विजयदिन समारोहावर संकट

कीव : रशियाने दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पराभव झाल्याच्या स्मृतिदिनानिमित्त आजच्या वार्षिक उत्सवापूर्वी देशातील सर्वात मोठ्या शहरांमध्ये ड्रोन आणि राइड-शेअरिंग सेवा स्थगित केली आहे. अगदी सेंट पीटर्सबर्गच्या कालव्यांवरील जेट स्कीच्या वापरावरही बंदी घालण्यात आला आहे. युक्रेनशी रशियाचे गेले १४ महिने युद्ध सुरू आहे. जर्मनी विजयाचा उत्सव ९ मे रोजी रशियात साजरा केला जातो.

लष्करी परेड रद्द - रशियातील किमान २१ शहरांनी ९ मे रोजीच्या लष्करी परेड रद्द केल्या आहेत, ही परेड रशियातील विजय दिनाच्या उत्सवाचा मुख्य भाग असते. प्रादेशिक अधिकार्‍यांनी सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करुन निर्बंध लादल्याचे आणि कार्यक्रम रद्द केल्याचे सांगितले आहे. गेल्या आठवड्यात, आक्रमणादरम्यान युक्रेनने रशियाला दोन युक्रेनियन ड्रोनद्वारे अंधारात लक्ष्य केले होते. यामुळे गोंधळ उडाला होता. विशेषत: दोन देशांच्या सीमेजवळील तेल डेपोंना लक्ष्य करून, युक्रेनियन सैन्यावर रशियाने हल्ला केला होता. मात्र विजय दिनापूर्वी दोन्ही शहरांमध्ये ड्रोनच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

जेट स्की वापरण्यास मनाई -सेंट पीटर्सबर्ग, नद्या आणि कालव्याच्या जाळ्यासाठी उत्तरेकडील व्हेनिस म्हणून ओळखले जाते. मात्र बुधवारपर्यंत शहराच्या काही भागात जेट स्की वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. रशियन राजधानीत, कार-शेअरिंग सेवा तात्पुरत्या प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. पारंपारिक रेड स्क्वेअर परेडच्या तयारीदरम्यान शहराच्या मध्यभागी चालक तेथे राइड करू शकणार नाहीत. सुरुवातीला, या वर्षीच्या मॉस्को परेडला किर्गिझचे अध्यक्ष सदीर झापरोव उपस्थित राहण्याची अपेक्षा होती. त्यांनी पुतीन यांच्याशी चर्चा केली होती मात्र कोणालाही यावर्षी आमंत्रित केले नाही.

उत्सवावर संकट - परंतु सोमवारी अधिकार्‍यांनी जाहीर केले की उझबेकचे अध्यक्ष शवकत मिर्झियोयेव आणि ताजिकचे अध्यक्ष इमोमाली राखमोन पुतिन आणि झापरोव्ह यांच्यासोबत आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान आणि कझाकिस्तानचे नेते कासिम-जोमार्ट तोकायेव यांच्यासोबत उत्सवात सामील होतील. सोमवारी उशिरा, बेलारशियन माध्यमांनी स्पष्ट केले आहे की, देशाचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को परेडमध्ये सहभागी होण्यासाठी मॉस्को येथे आले. कझाकस्तान आणि आर्मेनिया, रशियन मित्र असले तरी, युक्रेनमधील युद्धाला दोन्ही देशांनी जाहीरपणे समर्थन दिलेले नाही. खरे तर, टोकायेव यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी संपूर्ण आक्रमणात अनेकवेळा फोनवर संवाद साधला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details