महाराष्ट्र

maharashtra

Russia Ukraine Crisis : कदाचित तुम्ही मला शेवटचे जिवंत पाहात आहात, यूक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेंस्कींचे संकेत

By

Published : Feb 26, 2022, 6:02 PM IST

यूक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेंस्की यांनी नुकतेच एका व्हिडीओ कॉन्फरन्स कॉलवरुन युरोपीयन समकक्षांना एक अशूभ संकेत दिला (Ukraine's president warns EU leaders) आहे. ते अन्य नेत्यांना म्हणाले, कदाचित तुम्ही मला आज शेवटचे जिवंत पाहात आहात.

वलोडिमिर जेलेंस्की
वलोडिमिर जेलेंस्की

कीव ( यूक्रेन ) - यूक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेंस्की यांनी नुकतेच एका व्हिडीओ कॉन्फरन्स कॉलवरुन युरोपीयन समकक्षांसाठी एक अशूभ संकेत दिला (Ukraine's president warns EU leaders) आहे. ते अन्य नेत्यांना म्हणाले, कदाचित तुम्ही मला आज शेवटचे जिवंत पाहात आहात. यूक्रेनच्या राष्ट्रपतीच्या सल्लागाराने यापूर्वीच इशारा दिला होता की, रशिया यूक्रेनच्या राजधानीवर ताबा मिळवू शकतो आणि असे झाले तर ते जेलेंस्कीला ठार मारतील.

असे म्हटले जात आहे की, कीववर ताबा मिळाल्यास रशिया यूक्रेनमध्ये एक सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करेल. जी सरकार रशियाच्या इशारावर चालेल. एका मीडिया अहवालानुसार, यूक्रेनमध्ये विशिष्ट यूक्रेनी अधिकाऱ्यांना मारण्यासाठी एक विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.

अहवालानुसार, यूक्रेनी अधिकाऱ्यांचे फोटो व त्यांच्या माहितीसह विशेष 'कार्ड डेक' सैनिकांना देण्यात आले आहे. ही माहिती रशियाच्या तपास यंत्रणेनुसार संशयित अधिकारी व सुरक्षा अधिकाऱ्यांची असल्याचेही अहवालात म्हटले आहेत. दरम्यान, यूक्रेनच्या राष्ट्रपतीने स्वीकार केले आहे की, आपली राजधानी रशियासाठी क्रमांक एकचे लक्ष्य आहे, तर त्यांचे कुटुंब पुतिनच्या हल्लेखोरांसाठी क्रमांक दोनचे लक्ष्य आहे.

हेही वाचा -Russia Ukraine Crisis : 'युद्ध सुरुयं, मला शस्त्र द्या, पळ काढण्यासाठी विमान नाही'; युक्रेन राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेची ऑफर फेटाळली

ABOUT THE AUTHOR

...view details