महाराष्ट्र

maharashtra

पंजशीर ताब्यात घेतल्याचा विजयोत्सव; तालिबानींच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू

By

Published : Sep 4, 2021, 3:43 PM IST

Updated : Sep 4, 2021, 4:33 PM IST

पंजशीर ताब्यात घेतल्याचा दावा करत तालिबानींनी विजयोत्सव शुक्रवारी रात्री साजरा केला. यावेळी हवेत केलेल्या गोळीबारानंतर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती काबुलमधील आपात्कालीन रुग्णालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली आहे.

तालिबान
तालिबान

इस्तांबूल - तालिबानींनी अफगाणिस्तानमध्ये सत्ता आल्यानंतर धुडगूस घालण्यास सुरुवात केली आहे. तालिबानींनी पंजशीर ताब्यात घेतल्याचा दावा करत हवेत गोळीबार केला. या घटनेत दोन जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी झाले आहेत.

पंजशीर ताब्यात घेतल्याचा दावा करत तालिबानींनी विजयोत्सव शुक्रवारी रात्री साजरा केला. यावेळी हवेत केलेल्या गोळीबारानंतर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती काबुलमधील आपात्कालीन रुग्णालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली आहे. कारण, या अधिकाऱ्याला माहिती देण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. स्थानिक माध्यमाच्या माहितीनुसार 17 मृतदेह आणि 41 जखमी लोकांना आपात्कालीन रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

हेही वाचा-पंजशीरमध्ये तालिबानी घुसले? शोटुल जिल्हा ताब्यात घेतल्याचा दावा


तालिबानचा प्रवक्त्याकडून टीका
तालिबानचा प्रवक्ता झाबिहुल्लाह मुजाहिद याने ट्विट करत हवेत गोळीबार करण्याच्या पद्धतीवर टीका केली. दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करणे तत्काळ थांबवावे, असेही मुजाहिदने म्हटले आहे.

हेही वाचा-इडा चक्रीवादळाचा फटका; अमेरिकेच्या ईशान्य भागात 45 हून अधिक जणांचा मृत्यू

पंजशीर तालिबानच्या विरोधात खंबीरपणे उभा -

पंजशीर प्रांत अफगाणिस्तानच्या 34 प्रांतापैकी एक आहे. काबूलपासून 150 किलोमीटर अंतरावर हा प्रांत आहे. या प्रांताचे रक्षण पंजशीरचे शेर अशी ओळख असलेले अहमद शाह मसूद यांच्या नेतृत्वात नॉर्दन अलायन्स करत आहे. अहमद मसूद हे अहमद शाह मसूद यांचे पुत्र असून तालिबान्याच्या विरोधात उभे ठाकले आहेत. आपल्या वडिलांचा तालिबानविरोधी प्रतिकाराचा वारसा ते पुढे नेत आहेत. मुकाबला करू, पण शरण जाणार नाही, असे अहमद मसूद यांनी म्हटलं आहे. तालिबान्यांच्या विरोधात 1996 मध्ये अहमद शाह मसूद यांनीच नॉर्दन अलायन्सची पायाभरणी केली होती. नॉर्दर्न अलायन्स हा मजबूत सैनिकी गट आहे. याच्यासमोर तालिबानी टिकाव धरत नाहीत.

हेही वाचा-20 वर्ष, 2 ट्रिलियन डॉलर...मुदतीआधीच सैन्य माघारी परतलं; जाणून घ्या काय म्हणाले बायडेन...

Last Updated :Sep 4, 2021, 4:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details