महाराष्ट्र

maharashtra

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली युएनएससीची बैठक; रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सहभागी होणार

By

Published : Aug 9, 2021, 9:24 AM IST

पीएमओने सांगितले आहे की, युएनएससीने सागरी गुन्हेगारीच्या विविध पैलूंवर चर्चा केली आणि अनेक ठराव पारित केले आहेत. मात्र, हे पहिल्यांदाच असेल की, उच्च स्तरीय खुल्या चर्चेत एक विशेष अजेंड्या स्वरुपात सागरी सुरक्षेवर विस्ताराने चर्चा केली जाईल.

putin-to-participate-in-unsc-meeting-on-maritime-security
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली युएनएससीची बैठक

मॉस्को (रशिया) -संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेची बैठकीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सहभागी होणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या बैठकीचे अध्यक्षपद भूषवतील.

पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) देण्यात आलेल्या माहितीनुसार, या डिजिटल बैठकीत यूएनएससी सदस्य देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि सरकारचे प्रमुख आणि संयुक्त राष्ट्र व्यवस्था आणि प्रमुख प्रादेशिक संघटनांचे उच्च स्तरीय तज्ञ उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

या बैठकीत सागरी गुन्हेगारी आणि असुरक्षिततेचा प्रभावीपणे मुकाबला करण्याच्या मार्गांवर आणि सागरी क्षेत्रात समन्वय मजबूत करण्यासाठी लक्ष केंद्रित केले जाईल. पीएमओने म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या या खुल्या चर्चेचे अध्यक्षपद भुषवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय ठरतील.

पीएमओने सांगितले आहे की, युएनएससीने सागरी गुन्हेगारीच्या विविध पैलूंवर चर्चा केली आणि अनेक ठराव पारित केले आहेत. मात्र, हे पहिल्यांदाच असेल की, उच्च स्तरीय खुल्या चर्चेत एक विशेष अजेंड्या स्वरुपात सागरी सुरक्षेवर विस्ताराने चर्चा केली जाईल. कोणताही देश एकटा सागरी सुरक्षेच्या प्रश्वाचे समाधान करू शकत नाही. या विषयावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत विस्ताराने चर्चा करणे महत्त्वपूर्ण आहे, असेही पीएमओने सांगितले. पीएमओनुसार, 2019च्या, पूर्व आशिया शिखर संमेल्लनात इंडो पॅसिफिक सागरी उपक्रमाच्या माध्यमातून या विषयाला आणि विस्ताराने दिले गेले होते.

विशेष म्हणजे, भारताकडे यावर्षी ऑगस्ट महिन्यासाठी यूएनएससीचे अध्यक्षपद आहे. एक ऑगस्टपासून भारताने ही जबाबदारी सांभाळली आहे.

यूएनएससीमध्ये केवळ पाच स्थायी सदस्य आहेत. यात अमेरिका, चीन, ब्रिटनस रशिया आणि फ्रान्स यांचा समावेश आहे. तर सध्यस्थितीत भारत दोन वर्षांसाठी सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details