महाराष्ट्र

maharashtra

'संयुक्त राष्ट्रां'समोर पाक पुन्हा तोंडघशी; दोन भारतीयांना दहशतवादी ठरवण्याचा कट उधळला

By

Published : Sep 3, 2020, 7:36 AM IST

अंगारा अप्पाजी आणि गोविंद पटनाईक या दोन भारतीयांना दहशतवादी सिद्ध करण्याचा डाव पाकिस्तानने रचला होता. यासाठी त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील १२६७ दहशतवाद विरोधी समितीपुढे याचिका दाखल केली होती. मात्र, आपल्या खोट्या दाव्यावर पुरेसे पुरावे दाखवणे पाकिस्तानला शक्य झाले नाही...

Pakistan's efforts to designate 2 Indians as terrorists blocked at UNSC
'संयुक्त राष्ट्रां'समोर पाक पुन्हा पडले उघडे; दोन भारतीयांना दहशतवादी ठरवण्याचा कट उधळला

वॉशिंग्टन - दोन भारतीयांना दहशतवादी ठरवण्याचा पाकिस्तानचा कट, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने उधळून लावला आहे. दहशतवाद विरोधी विशेष कारवाई १२६७च्या अंतर्गत पाकिस्तान हे करु पाहत होते. मात्र, आपल्या खोट्या दाव्यावर पुरेसे पुरावे दाखवणे पाकिस्तानला शक्य झाले नाही. संयुक्त राष्ट्रांमधील देशाचे कायमस्वरुपी प्रतिनिधी असणारे टी. एस. त्रिमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली.

अंगारा अप्पाजी आणि गोविंद पटनाईक या दोन भारतीयांना दहशतवादी सिद्ध करण्याचा डाव पाकिस्तानने रचला होता. यासाठी त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील १२६७ दहशतवाद विरोधी समितीपुढे याचिका दाखल केली होती. यावेळी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी या देशांसमोर ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्यांनी पाकिस्तानला आपल्या दाव्याला सिद्ध करणारे पुरावे सादर करण्यास सांगितले. मात्र, पाकिस्तानला असे कोणतेही पुरावे सुरक्षा परिषदेसमोर सादर न करता आल्यामुळे, त्यांची याचिका रद्द करण्यात आली.

यापूर्वीही, अजोय मिस्त्री आणि वेणु माधव डोंगारा या दोन भारतीयांना दहशतवादी सिद्ध करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता. पाकिस्तान वारंवार संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताला दहशतवादाशी जोडण्याचा प्रयत्न करत आले आहे. मात्र प्रत्येक वेळी आपले दावे सिद्ध करण्यात पाकिस्तान अयशस्वी ठरले आहे.

हेही वाचा :पंतप्रधान मोदींचे ट्विटर अकाऊंट झाले 'हॅक'!

ABOUT THE AUTHOR

...view details