महाराष्ट्र

maharashtra

काबूलमधील लष्करी रुग्णालयाजवळ स्फोट; 19 जण ठार तर 50 जखमी

By

Published : Nov 3, 2021, 7:37 AM IST

काबूलच्या 10व्या जिल्ह्यातील सरदार मोहम्मद दाऊद खान हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्यात 19 जण ठार झाले असून 50 जण जखमी झाले आहेत

Explosion and gunfire heard near military hospital in Kabul
काबूल

काबूल -अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील लष्करी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी सहा हल्लेखोरांनी स्फोट घडवून रुग्णालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु तालिबानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना मागे ढकलले. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

अफगाणिस्तानची राजधानी काबुमधील लष्करी रुग्णालयाजवळ भीषण स्फोट

काबूलच्या 10व्या जिल्ह्यातील सरदार मोहम्मद दाऊद खान हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्यात 19 जण ठार झाले असून 50 जण जखमी झाले आहेत, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता हाती घेतल्यापासून आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. यापूर्वीच्या हल्ल्यांची जबाबदारी तालिबानचे शत्रू असलेल्या इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी स्वीकारली आहे.

संरक्षण मंत्रालयातील तालिबान अधिकारी हिबतोल्ला जमाल यांनी सांगितले की, सहा हल्लेखोर आले होते. त्यापैकी दोघांना पकडण्यात आले आहे. मृतामध्ये कर्मचारी आणि नागरिकांचा समावेश आहे. परंतु मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे जमाल म्हणाले. मृतांमध्ये तालिबानी सैनिकांचा समावेश आहे. परंतु मृतांमध्ये बहुतांश नागरिक आहेत. तालिबानने रुग्णालयावर ताबा मिळवला आहे.

वजीर अकबर खान रुग्णालयाचे संचालक सय्यद अब्दुल्ला अहमदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या रुग्णालयात अनेक मृतदेह आणि जखमींना दाखल करण्यात आले आहे. तर इतर 9 जणांना अफगाणिस्तानच्या आपत्कालीन रुग्णालयात नेण्यात आले आहे. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी गेल्या काही आठवड्यात अनेक हल्ले केले आहेत.

हेही वाचा -देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी

ABOUT THE AUTHOR

...view details