महाराष्ट्र

maharashtra

पाकिस्तानमध्ये 30 वर्षात 138 पत्रकारांची हत्या

By

Published : Dec 13, 2020, 5:20 PM IST

डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, आयसीजेने 'व्हाईट पेपर ऑन ग्लोबल जर्नलिझम' शुक्रवारी जाहीर केले आहे. यात इराक, मेक्सिको, फिलिपिन्स, पाकिस्तान आणि भारत या पाच देशांची यादी करण्यात आली असून असे म्हटले आहे की, जगात पत्रकारिता करण्यासाठी हे सर्वांत धोकादायक देश आहेत.

पाकिस्तान पत्रकारांची हत्या न्यूज
पाकिस्तान पत्रकारांची हत्या न्यूज

इस्लामाबाद - आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघाच्या (आयसीजे) च्या अहवालानुसार 1990 पासून पाकिस्तानमध्ये किमान 138 पत्रकारांची हत्या झाली आहे.

डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, आयसीजेने 'व्हाईट पेपर ऑन ग्लोबल जर्नलिझम' शुक्रवारी जाहीर केले आहे. यात इराक, मेक्सिको, फिलिपिन्स, पाकिस्तान आणि भारत या पाच देशांची यादी करण्यात आली असून असे म्हटले आहे की, जगात पत्रकारिता करण्यासाठी हे सर्वांत धोकादायक देश आहेत.

हेही वाचा -वॉशिंग्टनमधील गांधींच्या पुतळ्याची विटंबना; शेतकरी आंदोलनाआडून खलिस्तानी चळवळीचे कृत्य

या पत्रिकेनुसार 1990 पासून पाकिस्तानमध्ये 138 आणि भारतात 116 पत्रकारांच्या हत्या झाल्या आहेत. दरवर्षी येथे अशा घटना पाहायला मिळतात. आशिया पॅसिफिक प्रदेशात जगभरातील एकूण 40 टक्के हत्यांची नोंद आहे.

सन 2020 मध्ये 15 देशांतील पत्रकारांसह मीडिया कर्मचार्‍यांच्या 42 हत्यांची नोंद झाली आहे. तर, 2019 मध्ये 49 हत्यांच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत.

यावर्षी, पाकिस्तानमध्ये अझीझ मेनन, जावेदुल्ला खान, अनवर जान, शाहीना शाहीन यांनी प्राण गमावले आहेत.

हेही वाचा -इस्लामिक दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये मशिदींच्या तपासणीस प्रारंभ, अनेक बंद होण्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details