महाराष्ट्र

maharashtra

Ukraine Crisis : रशियाने दोन फुटीरतावादी प्रदेशांना स्वातंत्र्याची मान्यता; सुरक्षा परिषदेच्या बैठकीत युक्रेनची जोरदार हरकत

By

Published : Feb 22, 2022, 7:47 AM IST

Updated : Feb 22, 2022, 9:03 AM IST

Ukraine Crisis

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनमधील फुटीरतावादी प्रदेशांचे स्वातंत्र्य मान्य केल्यानंतर आणि तेथे शांतता राखण्याचे आदेश रशियन सैन्याला दिल्यानंतर सोमवारी रात्री संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद तातडीची बैठक घेणार आहे. युक्रेन, अमेरिका आणि इतर सहा देशांच्या विनंतीवरून ही बैठक होत आहे. युक्रेनवर होणारी ही बैठक सर्वांसाठी खुली असणार आहे.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियावर शांतता चर्चा उधळल्याचा आरोप केला आहे. तसेच कोणत्याही प्रादेशिक सवलती देण्यास नकार दिला. मंगळवारी पहाटे त्यांनी राष्ट्राला संबोधित केले. रशियाने सोमवारी संध्याकाळी दोन रशियन-समर्थित फुटीरतावादी प्रदेशांना औपचारिकपणे स्वतंत्र म्हणून मान्यता दिल्यानंतर युक्रेन शांतता आणि मुत्सद्देगिरीसाठी वचनबद्ध असल्याचे झेलेन्स्की यांनी सांगितले. तर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत युक्रेनेने रशियाच्या निर्णयावर जोरदार हरकत घेत त्यांनी केलेल्या तसेच करत असलेल्या कारवाईला आपला विरोध दर्शवला आहे.

राष्ट्रपती म्हणाले की युक्रेनला रशियाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आपल्या मित्र राष्ट्रांकडून स्पष्ट आणि प्रभावी पावले उचलण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी युक्रेन, रशिया, जर्मनी आणि फ्रान्सच्या नेत्यांची आपत्कालीन शिखर परिषद बोलावण्यात आली आहे.

सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक -

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनमधील फुटीरतावादी प्रदेशांचे स्वातंत्र्य मान्य केल्यानंतर आणि तेथे शांतता राखण्याचे आदेश रशियन सैन्याला दिल्यानंतर सोमवारी रात्री संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद तातडीची बैठक घेणार आहे. युक्रेन, अमेरिका आणि इतर सहा देशांच्या विनंतीवरून ही बैठक होत आहे. युक्रेनवर होणारी ही बैठक सर्वांसाठी खुली असणार आहे.

व्यवहारांवर बंदी - अमेरिकेचे आदेश

युक्रेनचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता कमी करण्याचे रशियाने प्रयत्न चालविले आहे. रशियाच्या या धोरणांना प्रतिबंध घालण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी विशिष्ट व्यक्तींवरील मालमत्ता अवरोधित करणे आणि काही व्यवहारांवर बंदी घालण्यासंदर्भातील आदेशावर स्वाक्षरी केली आहे. हा आदेश युक्रेनच्या डीएनआर आणि एलएनआर या प्रदेशांमध्ये तसेच इतरही प्रदेशांमध्ये लागू राहील. त्यामुळे रशियाला व्यवसायासंदर्भातील पुढील पाऊले उचलण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात.

परिषदेत भारताची भूमिका -

रशियन फेडरेशनसह युक्रेनच्या सीमेवर वाढलेला तणाव हा चिंतेचा विषय आहे. या घडामोडींमध्ये प्रदेशातील शांतता आणि सुरक्षा बिघडवण्याची क्षमता आहे, असे भारताचे संयुक्त राष्ट्रांचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी संयुक्त राष्ट्र समितीच्या सुरक्षा परिषदेत म्हटले. तसेच नागरिकांची सुरक्षा आवश्यक असून 20 हजारहून अधिक भारतीय विद्यार्थी आणि नागरिक युक्रेनच्या सीमावर्ती भागांसह विविध भागांमध्ये राहतात आणि अभ्यास करतात. परस्पर सौहार्दपूर्ण तोडगा लवकरात लवकर काढण्यात येण्याची खात्री असून संयम ठेवून आणि राजनैतिक प्रयत्न तीव्र करून आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी सर्व बाजूंनी महत्त्वाच्या निर्णयांवर आम्ही भर देत असल्याची भूमिका तिरूमूर्ती यांनी मांडली.

Last Updated :Feb 22, 2022, 9:03 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details