महाराष्ट्र

maharashtra

'बिग बॉस 16'च्या घरात साजिद खान बनला नवा कर्णधार

By

Published : Nov 15, 2022, 4:33 PM IST

वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' मधील टास्क जिंकल्यानंतर चित्रपट निर्माता साजिद खानला कॅप्टन होण्याचा सन्मान देण्यात आला आहे आणि आता त्याला घर चालवण्याचे नवीन अधिकार देण्यात आले आहेत.

साजिद खान बनला नवा कर्णधार
साजिद खान बनला नवा कर्णधार

मुंबई - वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' मधील टास्क जिंकल्यानंतर चित्रपट निर्माता साजिद खानला कर्णधाराचा सन्मान देण्यात आला आहे. आता तो आपल्या तंत्राने घर चालवताना पाहायला मिळणार आहे.

कॅप्टन्सी टास्क नवीन एपिसोडमध्ये पार पडला. यात बिग बॉसने जाहीर केले की हे टास्क घरामध्ये फेरफटका मारणार आहे आणि साजिद टूर गाइड असेल. कर्णधारपदासाठी साजिद खान आणि टीना दत्ता उत्सुक होते. अखेर ही कर्णधारपदाची माळ साजिदच्या गळ्यात पडली आहे.

साजिदला घरचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केल्यानंतर, फायदे देखील बदलले गेले. बिग बॉसने आपल्या आवाजात असे म्हटले आहे की जे दोन स्पर्धक साजिदसोबत रूम शेअर करतील ते कर्तव्यापासून मुक्त असतील आणि नामांकनांपासूनही सुरक्षित राहतील.

हेही वाचा -''मोठे नुकसान...,'' म्हणत रजनीकांत, चिरंजीवीनी वाहिली कृष्णा यांना श्रध्दांजली

ABOUT THE AUTHOR

...view details