महाराष्ट्र

maharashtra

Abdu Rozik Bigg Boss : बिग बॉस 16 फेम अब्दू रोजिक आता बिग ब्रदर यूकेमध्ये दिसणार!

By

Published : Jan 27, 2023, 7:39 AM IST

बिग बॉ या शोने अब्दू याला देशातच नव्हे तर परदेशातही प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो लवकरच बिग ब्रदर यूकेमध्ये दिसणार आहे. त्याला बिग ब्रदर यूकेच्या आगामी सीझनची ऑफर देण्यात आली आहे

Abdu Rozik Bigg Boss
अब्दू रोजिक

मुंबई : सलमान खानच्या वादग्रस्त टीव्ही शो बिग बॉस 16 मधून बाहेर पडलेला स्पर्धक अब्दू रोजिक आता पुन्हा बिग बॉसचा भाग बनणार आहे! होय, ही बातमी खरी आहे, मात्र तो भारतातील बिग बॉस नव्हे तर याच शोच्या यूके आवृत्तीमध्ये सामील होणार आहे, ज्याचे नाव बिग ब्रदर आहे. ताजिकिस्तानमधील हा सोशल मीडिया सेन्सेशन आणि गायक त्याच्या गोंडस लूकमुळे आणि साध्या वागण्यामुळे प्रेक्षकांचा आवडता चेहरा बनला होता.

प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय : बिग बॉ या शोने अब्दूला देशातच नव्हे तर परदेशातही प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. मात्र, त्याची प्रसिद्धी इथेच थांबणार नाही आणि मिळालेल्या माहितीनुसार, तो लवकरच बिग ब्रदर यूकेमध्ये दिसणार आहे. प्रेक्षकांच्या या आवडत्या स्टारला बिग ब्रदर यूकेच्या आगामी सीझनची ऑफर देण्यात आली आहे आणि अब्दूने या शोमध्ये सहभागी होण्यास होकार दिल्याचेही सांगण्यात येत आहे.

मुळचा ताजिकिस्तानचा : बिस बॉस शोमध्ये अब्दू उर्फ ​​छोटा भाईजानला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले होते. या सोबतच घरातील बहुतांश सदस्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. मिळालेल्या माहितीनुसार, अब्दू जून किंवा जुलैमध्ये या शोसाठी यूकेला रवाना होऊ शकतो. मुळचा ताजिकिस्तानचा असलेला अब्दू एक प्रसिद्ध गायक, संगीतकार तसेच ब्लॉगर आणि बॉक्सर देखील आहे. एवढेच नाही तर जगातील सर्वात तरुण गायक होण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

शो ऑक्टोबर मध्ये सुरू झाला होता : बिग बॉस 16 शो ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू झाला होता. वाढत्या टीआरपीमुळे हा वादग्रस्त रिअॅलिटी शो महिनाभर पुढे वाढवला गेला आहे. आता हा शो १२ फेब्रुवारीला संपणार आहे. सध्या शोच्या हाऊसमेट्समध्ये अर्चना गौतम, शिव ठाकरे, सुंबुल तौकीर, प्रियांका चौधरी, एमसी स्टॅन, निमृत कौर अहलुवालिया, टीना दत्ता आणि शालिन भानोत यांचा समावेश आहे. बिग बॉस 16 हा रिअॅलिटी शो दिवसेंदिवस रंजक होत आहे. शोचा होस्ट सलमान खानच्या निर्णयानंतर सौंदर्या शर्माला प्रेक्षकांच्या मतांच्या आधारे बिग बॉसच्या घरातून बाहेर जावे लागले होते. तसेच अभिनेता शाहरुख खानने त्याचा बहुचर्चित 'पठान' चित्रपटाचे प्रमोशन बिग बॉसच्या मार्फत न करण्याचा निर्णय घेतला होता. चित्रपट विनाकारण कोणत्याही वादात अडकू नये यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा :'Gadar 2 Release Date : 22 वर्षांनंतर तारा सिंहची मोठ्या पडद्यावर वापसी!, पाहा गदर-2 चा फर्स्ट लूक

ABOUT THE AUTHOR

...view details