महाराष्ट्र

maharashtra

Elvish Yadav Clarification Video : सापाच्या विषाची तस्करी करत असल्याचा आरोपाचं एल्विश यादवनं केलं खंडन

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 3, 2023, 4:21 PM IST

Elvish Yadav Clarification Video : बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादव याच्या विरोधात नोएडातील पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरुपाची एफआयआर दाखल झालीय. त्याच्यावर रेव्ह पार्ट्या आजोजित करुन त्यामध्ये अंमली पदार्थ आणि सापा विषाची तस्करी करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. एल्विशनं एक व्हिडिओ जारी करुन हे या सर्व आरोपांचे खंडन केलंय.

Elvish Yadav Clarification Video
एल्विश यादव

मुंबई- बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादववर सापांच्या विषाची तस्करी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. त्याच्यावर आरोप आहे की, राजधानी दिल्लीला लागून असलेल्या नोएडा औद्योगिक परिसरात विषारी साप आणि ड्रग्सचा तो व्यापार करतो आणि रेव्ह पार्ट्याही आयोजित करतो. या प्रकरणी नोएडा पोलिसांनी एल्विश यादवविरोधात एफआयआरही नोंदवण्यात आलाय. एल्विश यादवची ही बातमी सोशल मीडियावर आणि देशभरात वाऱ्यासारखी पसरलीय.

आता स्वत: एल्विश यादवने आपल्यावरील या गंभीर आरोपांचे खंडन करण्यासाठी सोशल मीडियावर एक व्हिडिओ तातडीने जारी केला आहे. 3 नोव्हेंबर रोजी एल्विशने त्याच्या इंस्टाग्राम आणि एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो म्हणताना दिसतोय की, त्याच्यावर लावलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत आणि तो तपासासाठी पूर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहे. या आरोपांवर एल्विश यांनी आपले संपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. जाणून घ्या काय म्हणतोय एल्विश यादव...

कृपया माझे नाव खराब करू नका, एल्विश यादवची मीडियाला विनंती - एल्विशने त्याच्या इंस्टाग्राम आणि एक्स हँडलवर एक व्हिडिओ जारी करून या गंभीर आरोपांवर स्पष्टीकरण दिलंय. या व्हिडीओमध्ये एल्विश म्हणतोय, 'हॅलो दोस्तहो, मी पाहिलं की माझ्या विरोधात कसल्या बातम्या येत आहेत, एल्विश यादवसोबत असं घडलं, त्याला असं पकडलं, या सगळ्या गोष्टी माझ्याविरोधात पसरवल्या जात आहे. जे काही आरोप आहे ते निराधार आहेत, साफ खोटे आहेत. त्यात जरासेही तथ्य नाही.'

मुख्यमंत्री योगी यांनाही एल्विशची विनंती - व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण देताना एल्विश यादव म्हणाला, 'मी यूपी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. यूपी पोलीस प्रशासन आणि माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांना विनंती करेन की, जर या आरोपांमध्ये माझा एक टक्काही सहभाग असेल. किवा दूरान्वयेही संबंध आढळून आले तर मी सर्व जबाबदारी घेण्यास तयार आहे आणि माध्यमांना विनंती करतो की माझ्या विरोधात कोणतीही बातमी ठोस पुराव्याशिवाय बातमी प्रकाशित करू नका, कृपया माझे नाव खराब करू नका. माझ्यावर जे काही आरोप केले जात आहेत, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. दूर दूरपर्यंत या प्रकरणाशी माझा संबंध नाही.'

हेही वाचा -

  1. Vidya Karanjikar Strange Experience : बास्केटमधून होते कुत्र्यांच्या पिल्लांची डिलीव्हरी, अभिनेत्री विद्या करंजीकरांचा धक्कादायक अनुभव

2.Fir Against Elvish Yadav : एल्विश यादवच्या नसानसात भरलंय 'विष'? तस्करी प्रकरणी पाच साथीदारांसह 9 विषारी साप ताब्यात

3.Uorfi Javed Viral Video : बोल्ड कपड्यातील उर्फी जावेदच्या अटकेचा व्हिडिओ निघाला प्रँक

ABOUT THE AUTHOR

...view details