महाराष्ट्र

maharashtra

Adipurush And Chandrayaan-3 : 'चंद्रयान ३'च्या यशानंतर 'आदिपुरुष' चित्रपट झाला ट्रोल...

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2023, 1:20 PM IST

'चंद्रयान ३'च्या यशाचा आनंद प्रत्येक भारतीय साजरा करत आहे. यासोबतच कमी बजेटमध्ये सुपरहिट ठरलेल्या या मिशनबद्दल 'आदिपुरुष' चित्रपटाच्या निर्मात्यांना सोशल मीडियावर लोक खूप टोमणे मारत आहेत.

Adipurush And Chandrayaan-3
आदिपुरुष आणि चंद्रयान-३

मुंबई : प्रभास आणि क्रिती सेनॉन यांचा चित्रपट 'आदिपुरुष' यावर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या पटकथा आणि संवादांमुळे हा चित्रपट खूप ट्रोल झाला होता. या चित्रपटाचे बजेट ६०० कोटी होते. 'आदिपुरुष'ने लागणारे बजेट देखील पूर्णपणे भरुन काढले नाही. 'चंद्रयान ३'च्या यशानंतर 'आदिपुरुष' पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. सोशल मीडियावर सध्या 'आदिपुरुष' या चित्रपटला खूप ट्रोल केले जात आहे. 'चंद्रयान ३'चे बजेट जवळपास ६१५ कोटी होते. चंद्रावर पोहोचून भारताने इतिहास रचला आहे. तर दुसरीकडे 'आदिपुरुष'वर एवढा पैसा उधळल्याने काय मिळविले हा प्रश्न अनेकजण करत आहेत.

'चंद्रयान ३' : २३ ऑगस्ट २०२३ रोजी इस्रोने जगासमोर एक इतिहास रचला आहे. इस्रोने चंद्राच्या दक्षिण गोलार्धात 'चंद्रयान ३'चे विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंग करून जगाला चकित केले आहे. या ऐतिहासिक आणि अतुलनीय यशाचा देशभरात मोठ्या प्रमाणावर आनंद साजरा केला जात आहे. दरम्यान, 'चंद्रयान ३'चे बजेट इतके कमी होते की हॉलिवूड चित्रपटाचे बजेटही त्यापेक्षा जास्त असल्याचे बोलले जात आहे. प्रभासचा 'आदिपुरुष' रुपेरी पडद्यावर खूप वाईटरित्या फ्लॉप झाला. दरम्यान आता अनेक वापरकर्त्यांनी ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' चित्रपटाच्या बजेटची यशस्वी मून मिशन 'चंद्रयान ३' शी तुलना करून खिल्ली उडवली आहे. वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून 'आदिपुरुष'चे बजेट ६०० असल्यानंतरही हा चित्रपट फ्लॉप झाल्याचे म्हटले आहे. काहीजण हा चित्रपट पूर्णपणे बकवास आणि फ्लॉप असल्याचे म्हणत आहेत. त्याचबरोबर ६१५ कोटींच्या अत्यंत कमी बजेटमध्ये तयार झालेले 'चंद्रयान ३' चंद्रावर जाऊन जगभर हिट ठरले, याबद्दल अनेकजण इस्रोचे अभिनंदन करत आहेत.

  • वापरकर्त्यांच्या कमेंट :'चंद्रयान ३'च्या यशानंतर लोक 'आदिपुरुष' चित्रपटाला ट्रोल करत एका युजरने लिहिले - ६०० कोटी 'आदिपुरुष'च्या निर्मित्यांनी इस्रोच्या वैज्ञानिकाला द्यायला हवे होते. तर दुसर्‍याने लिहिले, सेलिब्रिटींना इतके महत्त्व देण्यापेक्षा भारतीय शास्त्रज्ञांना सुरक्षा द्या, या 'सुपरस्टार्स'ना नाही. अशा अनेक कमेंट पोस्टवर येत आहेत.
  • आदिपुरुष या चित्रपटाचा वाद : 'आदिपुरुष' चित्रपटाबाबत अनेक वाद निर्माण झाले होते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देशात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. जूनमध्ये रिलीज झालेला हा चित्रपट रामायणावर आधारित होता. 'आदिपुरुष'मुळे अनेक भाविकांच्या भावना दुखविल्या गेल्या, त्यानंतर या चित्रपटावर बंदी आणावी असे म्हटले गेले होते.

हेही वाचा :

  1. Jailer movie box office collection day 14 : सुपरस्टार रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट देशांतर्गत लवकरच पार करेल ३०० कोटीचा आकडा...
  2. seema deo passes away : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे दीर्घ आजारानं निधन
  3. Gadar 2 vs OMG 2 box office day 13: 'गदर २' आणि 'ओ माय गॉड २' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर करत आहेत जबरदस्त कामगिरी...

ABOUT THE AUTHOR

...view details