ETV Bharat / entertainment

Gadar 2 vs OMG 2 box office day 13: 'गदर २' आणि 'ओ माय गॉड २' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर करत आहेत जबरदस्त कामगिरी...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 6:03 PM IST

सनी देओलचा चित्रपट 'गदर २' आणि अक्षय कुमारचा 'ओ माय गॉड २' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर चांगली कमाई करत आहेत. 'ओ माय गॉड २' हा चित्रपट 'गदर २'पेक्षा कमी कमाई करत आहे, तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकून आहे.

Gadar 2 vs OMG 2
गदर २ आणि ओ माई गॉड २

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा 'गदर २' आणि अक्षय कुमारचा 'ओ माय गॉड २' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहेत. हे चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात खूप गर्दी होत आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, 'गदर २'ने तेराव्या दिवशी देशांतर्गत १० कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाची एकूण कमाई ४१०.१८ कोटी झाली आहे. बुधवार, २३ ऑगस्ट २०२३ रोजी, सुरुवातीच्या अंदाजानुसार, 'गदर २'चा एकूण हिंदी व्याप ११.१३% होता. दुसरीकडे, 'ओ माय गॉड २'ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या १२ दिवसात अंदाजे रु १२०.६२ कोटीची कमाई केली. तेराव्या दिवशी, 'ओ माय गॉड २'ने देशांतर्गत ३ कोटी कमावले आहेत. यासह या चित्रपटाची एकूण कमाई १२३.६२ कोटी झाली आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार, बुधवार, २३ ऑगस्ट २०२३ रोजी 'ओ माय गॉड २'ची हिंदी व्याप्ती ११.२८% होती.

'गदर २'ने बॉक्स ऑफिसवर करत आहे जादू : सनी देओलच्या 'गदर २'ने बॉक्स ऑफिसवर अवघ्या १३ दिवसांत ४०० कोटींचा टप्पा पार केला आहे. हा चित्रपट सिंगल स्क्रिनवर हाऊसफुल बोर्डसह बॉक्स ऑफिसवर इतिहास रचत आहे. याशिवाय दुसऱ्या आठवड्यात, अक्षय कुमारचा 'ओ माय गॉड २' हा देखील थिएटरमध्ये चांगली कामगिरी करत आहे. 'ओ माय गॉड २'ला 'गदर २' सोबत संघर्षाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमी कमाई केली आहे. 'ओ माय गॉड २' हा अक्षय कुमारचा यावर्षीचा बॉक्स ऑफिसवर सर्वोत्तम कामगिरी करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात अक्षयने भगवान शिवाच्या संदेशवाहकाची भूमिका साकारली आहे. दुसरीकडे पंकज त्रिपाठी हा शिवभक्ताच्या भूमिकेत आहेत.

जेलर चित्रपटाला टाकेल मागे : 'गदर २'च्या १३व्या दिवसाचे कमाईचे आकडे जाहीर झाल्यानंतर असे वाटत आहे की, हा चित्रपट 'जेलर'ला मागे टाकू शकतो. 'गदर २' ४०० कोटीच्या क्लबमध्ये गेल्यानंतर या चित्रपटाकडून आता बरीच अपेक्षा केली जात आहे. 'गदर २' हा 'गदर:एक प्रेम कथा' या चित्रपटाचा सीक्वल आहे. 'गदर : एक प्रेम कथा' हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता.

हेही वाचा :

  1. Chandrayaan 3 Landing : मिशन मून आणि अवकाशवर आधारित बॉलिवूड चित्रपट...
  2. Disha Parmar Vaidya : दिशा परमारने शेअर केला बेबी बंप फ्लॉंट करताचा फोटो...
  3. Chandrayaan 3: 'चंद्रयान-३' लँडिंगचा आनंद साजरा करत सेलिब्रिटींनी दिल्या इस्रोला शुभेच्छा...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.