महाराष्ट्र

maharashtra

टायगर 3 'या'ओटीटी प्लॅटफॉर्मवर झाला रिलीज

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2024, 1:13 PM IST

Updated : Jan 7, 2024, 3:33 PM IST

Tiger 3 ott release: अभिनेता सलमान खाननं अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं 'टायगर 3' पोस्टर शेअर केलं आहे.

Tiger 3 ott release
टायगर 3 ओटीटी रिलीज

मुंबई - Tiger 3 : गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफचा 2017 मध्ये आलेल्या 'टायगर जिंदा है' चित्रपटाचा सीक्वल जगभरात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करण्यात यशस्वी ठरला होता. आता, जवळजवळ दोन महिन्यांनंतर, अ‍ॅक्शन-ड्रामा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. काल सलमान खाननं सोशल मीडियावर त्याच्या 'टायगर 3' चित्रपटाचे नवीन पोस्टर पोस्ट केले होते. शेवटी सलमान खान स्टारर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमॅझोन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. मनीष शर्माचा 2023 चा हिट चित्रपट ओटीटीवर दाखल झाल्यानं सलमानचे चाहते खूप खुश आहेत.

सलमान खान शेअर केली पोस्ट :सोशल मीडियावर पोस्टर शेअर करताना सलमाननं लिहिलं, ''लॉक्ड, लोडेड अ‍ॅन्ड रेडी! 'टायगर 3' येत आहे. 'टायगर 3' आता फक्त प्राइम व्हिडिओवर पाहा.'' या चित्रपटात सलमान खानशिवाय कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. 'टायगर 3'मध्ये इमरान हाश्मी हा खलनायकाच्या भूमिकेत आहे. 'टायगर 3', मनीश शर्मा दिग्दर्शित आणि आदित्य चोप्रा निर्मित, 'टायगर जिंदा है' नंतर यशराज फिल्मचा गुप्तहेर विश्वाचा पाचवा चित्रपट आहे. 'टायगर 3' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. या चित्रपटामधील गाणी देखील अनेकांना आवडली. 'टायगर 3'मधील इमरान हाश्मीचे आतिश रेहमान हे पात्र अनेकांना खूप आवडलं.

'टायगर 3' चित्रपट:सलमान खान आणि कतरिना कैफ या चित्रपटामध्ये अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसले आहे. या चित्रपटानं जगभरात 466.63 कोटीची कमाई केली आहे. 'टायगर 3' चित्रपटात झोयाची भूमिका साकारल्यानंतर कतरिना कैफ आता मेरी ख्रिसमसच्या रिलीजच्या तयारीला लागली आहे. श्रीराम राघवननं कतरिना कैफला विजय सेतुपतीबरोबर कास्ट केलं आहे. कतरिनाचा हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. या चित्रपटामध्ये कतरिना ही अनोख्या अंदाजात दिसेल. या चित्रपटासाठी अनेकजण वाट पाहत आहेत. तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असल्यानं कतरिना ही खूप उत्साहीत आहे.

हेही वाचा :

  1. महेश बाबूचा 85 फूट कट आऊट, 'गुंटूर कारम' होणार 'या' दिवशी रिलीज
  2. 'फायटर'मधील 'हीर आसमानी' गाण्याचा टीझर प्रदर्शित
  3. ब्रेकअपच्या वावड्या उडत असताना मित्राच्या लग्नात मिरवले मलायका आणि अर्जुन कपूर
Last Updated :Jan 7, 2024, 3:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details