महाराष्ट्र

maharashtra

Tiger 3 box office collection day 4: सलमान खान - कतरिना कैफच्या 'टायगर 3' ची भाऊबीजेला घसरण

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2023, 12:41 PM IST

Tiger 3 box office collection day 4: सलमान खानच्या 'टायगर 3' चित्रपटाच्या कमाईत संकलनात जवळपास 25 टक्क्यांनी घट झाली. असे असले तरी चौथ्या दिवसाच्या अखेरीस चित्रपटानं भारतात 169 कोटी रुपयांची कमाई केलीय.

Tiger 3 box office collection day 4
'टायगर 3' ची भाऊबीजेला घसरण

मुंबई- Tiger 3 box office collection day 4: सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या दिवाळीत रिलीज झालेल्या 'टायगर 3' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग करत गर्जना केली. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी उत्तम कमाई केल्यानंतर तुलनेनं तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीच्या कमाईत घट जाणवली. असं असलं तरी भारतात अवघ्या चार दिवसांत 'टायगर 3' नं एकूण १६९ कोटी रुपयांची कमाई केलीय. हा चित्रपट आता 200 कोटींचा आकडा पार करण्याच्या मार्गावर पुढे सरकतोय.

'टायगर 3' हा यशराज फिल्म्सच्या स्पाय फ्रँचायझीमधला पाचवा भाग आहे. याच्या रिलीजची मोठी प्रतीक्षा चाहत्यांना करावी लागली होती. रिलीजनंतर अपेक्षित प्रतिसादही मिळालाय. भारतात रिलीजच्या पहिल्या दिवशी चित्रपटानं सर्व भाषांमध्ये 44.50 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र ट्रेड रिपोर्ट्सनुसार बुधवारी भाऊबीजेचा सण देशभर वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा होत असल्यामुळे चित्रपटाच्या कमाईत 25 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. या दिवशी चित्रपटाच्या एकूण कलेक्शनमध्ये केवळ 22 कोटी रुपयांची भर पडली. आत्तापर्यंत, 'टायगर 3' ने भारतात एकूण 169.50 कोटी रुपयाचा गल्ला जमा केलाय. चित्रपटानं चौथ्या दिवशी सरासरी 18.78 टक्के व्याप्ति राखल्याचं सांगण्यात येतंय..

'टायगर 3' हा चित्रपट 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है' या पहिल्या दोन टायगर फ्रँचाइजीचा पुढील भाग आहे. यशराजच्या 'टायगर', 'वॉर' आणि 'पठाण' या स्पाय युनिव्हर्सचा हा एक भाग आहे. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ यांनी अविनाश आणि झोया या त्यांच्या भूमिका पुन्हा साकारल्या आहेत. मनीश शर्मा दिग्दर्शित आणि आदित्य चोप्रा निर्मित 'टायगर 3' हा टायगर फ्रँचायझीमधील तिसऱ्या भागात शाहरुख खान आणि हृतिक रोशन यांची कॅमिओ एन्ट्री होती.

'टायगर 3' चा साउंडट्रॅक संगीतकार प्रीतमने संगीतबद्ध केला आहे, तर पार्श्वसंगीत तनुज टिकूने तयार केलंय. 'टायगर 3' चे अंदाजे बजेट तब्बल 300 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे यशराज फिल्म्सचा हा एक सर्वात महागडा चित्रपट ठरलाय.

हेही वाचा -

  1. Bigg Boss 17 Day 33 Highlights: अंकिता लोखंडे गरोदर असल्याची चिंता, बिग बॉसमध्ये रंगलं नवं नाट्य

2.Nana Patekar Apology: तो सीनचा एक भाग होता, पण मार खाणारा दुसराच निघाला : नाना पाटेकरचा माफीनामा

3.Anushka Sharma Showers Praises Virat Kohli : 'विराट' पराक्रमानंतर अनुष्काची खास पोस्ट, पतीचं केलं भरभरून कौतुक

ABOUT THE AUTHOR

...view details