महाराष्ट्र

maharashtra

The Kerala Story box office Day 12: अदा शर्माच्या द केरळ स्टोरीने ओलांडला १५० कोटीचा आकडा

By

Published : May 17, 2023, 1:15 PM IST

सुदीप्तो सेन दिग्दर्शित द केरळ स्टोरी चित्रपटासाठी बॉक्स ऑफिसवर होणारी गर्दी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. चित्रपटाने देशांतर्गत १५० कोटींची कमाई पार केली आहे.

The Kerala Story box office Day 12
द केरळ स्टोरीने ओलांडला १५० कोटीचा आकडा

मुंबई - अभिनेत्री अदा शर्माची मुख्य भूमिका असलेल्या द केरळ स्टोरी चित्रपटाने अनेक वादांनी आमंत्रण दिलेले असतानाही थिएटरमध्ये गर्दी खेचण्यात यश मिळविले आहे. हा चित्रपट 2023 मधील सर्वाधिक कमाई करणार्‍या चित्रपटांपैकी एक म्हणून उदयास आला आहे आणि बॉक्स ऑफीस कलेक्शनच्या बाबतीतही चित्रपटाने आघाडी कायम ठेवली आहे.

द केरळ स्टोरीने केली १५० कोटींची कमाई- या चित्रपटाने देशांतर्गत मार्केटमध्ये अवघ्या 12 दिवसांत 150 कोटींचा टप्पा ओलांडला आणि अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या गतीने द केर स्टोरी चित्रपट लवकरच भारतात 200 कोटींचा आकडा पार करेल. विविध राज्यांनी लादलेल्या बंदी आणि वादांच्या पार्श्‍वभूमीवर, 'द केरळ स्टोरी' भारतात 5 मे रोजी प्रदर्शित झाला होता. अभिनेत्री अदा शर्मा हिती भूमिका असलेला व सुदिप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटावर पश्चिम बंगाल राज्यात बंदी घालण्यात आली आहे आणि तो तामिळनाडू राज्यातही थिएटर्स मिळालेले नाहीत.

२०० कोटीकडे द करेळ स्टोरीची वाटचाल - सिने ट्रेड विश्लेषकांच्या मते, द केरळ स्टोरी 16 मे रोजी थिएटरमध्ये 150 कोटींचा टप्पा ओलांडण्यात यशस्वी ठरला आहे. ज्यामुळे देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत चित्रपटाचे एकूण कलेक्शन 156.84 कोटी झाले आहे. अदा शर्मा स्टारर चित्रपट आणखी एका आठवड्यात 200 कोटींचा आकडा पार करेल.

द केरळ स्टोरी वादाच्या भोवऱ्यात - 'द केरळ स्टोरी' मध्ये केरळमधील एका हिंदू महिलेची कथा दाखवण्यात आली आहे जिचे ब्रेनवॉश करून इस्लाम स्वीकारण्यात आले आणि नंतर जागतिक दहशतवादी संघटना ISIS मध्ये तिला सामील होण्यासाठी सीरियाला तस्करी केली गेली. 'द केरळ स्टोरी'ची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली असून दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. रिलीजच्या काही दिवस आधी, निर्मात्यांनी कायदेशीर हस्तक्षेपामुळे 'केरळमधील 32,000 महिलांना या घटनेचा फटका बसला' असा दावा बदलून 'तीन महिला' असा केला. यामुळे मोठ्या वादाला तोंड फुटले होते, ज्यामुळे लोकांना चित्रपट आणि निर्मात्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

हेही वाचा -Cannes Film Festival 2023 : मानुषी छिल्लरने कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023मध्ये पांढऱ्या गाऊनमध्ये मारली एन्ट्री

ABOUT THE AUTHOR

...view details