महाराष्ट्र

maharashtra

Sameer Wankhede Issue : लाच घेणारा तसेच लाच देणारा देखील आरोपी; समीर वानखेडेंच्या वकिलांचा न्यायालयात सवाल

By

Published : Jul 6, 2023, 12:37 PM IST

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामध्ये लाज घेणारा तसेच लाच देणारा देखील आरोपी हा गुन्हेगार असू शकतो मग सीबीआयने एफ आय आरमध्ये लाच देणाऱ्याची नोंद का केली नाही. असा सवाल समीर वानखेडे यांच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे.

Sameer Wankhede Issue
समीर वानखडे प्रकरण

मुंबई : आर्यन खान ड्रग्स प्रकरणांमध्ये तत्कालीन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्थिक गैरव्यवहार केला, असा आरोप त्यांच्यावर केला गेला आहे. या प्रकरणी सी बी आयने बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याबद्दल वानखेडेच्या विरोधात एक एफ आय आर दाखल केली आहे. या अंतर्गत सीबीआयकडे त्यांची चौकशी सुरू आहे. या संदर्भात आज झालेल्या सुनावणीमध्ये समीर वानखेडे यांनी याचिकेमध्ये सुधारणा करण्याची परवानगी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस गडकरी यांच्या खंडपीठांसमोर केली आहे. वानखेडेला न्यायालयाने ही शेवटची संधी सुधारण्यासाठी दिली आहे. न्यायालयाने हा दिलासा दिल्यामुळे समीर वानखेडे यांची २० जुलै पर्यंत अटक टळली आहे.

वकिलाने केला युक्तिवाद : समीर वानखडे यांच्या बाबत गृहमंत्रालयाला चौकशी करण्याचा अधिकारच नाही, असा युक्तिवाद वकिलांनी केला आहे. तत्कालीन एनसीबीचे अधिकारी असताना समीर वानखेडे यांना आर्यन खानला सोडण्यासाठी शाहरुख खान यांच्याकडून २५ कोटी रुपयाची लाच दिली. अशा पद्धतीची एफ. आय .आर सी बी आयने दाखल केली आहे. या प्रकरणाला गृह विभागाने आधी मंजुरी दिली होती. परंतु या संपूर्ण चौकशीबाबत आज देखील न्यायालयामध्ये प्रश्न उपस्थित केला गेला आहे. 'जर समीर वानखेडे हे वित्त मंत्रालयाचे सरकारी नोकर आहे तर गृह मंत्रालय याबाबत चौकशीची प्राथमिक मंजुरी देऊ शकतच नाही. 'हा मुद्दा वानखेडे यांचे वकील आबाद फोंडा यांनी खंडपीठांसमोर उपस्थित केला आहे.



भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक कायदा कलम १७ 'अ' आधार घेतला : समीर वानखेडे यांच्या वकिलांनी आज खंडपीठांसमोर हा देखील मुद्दा उपस्थित केला. 'की भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक कायदा यामध्ये कलम १७ अ नुसार लाच घेणारा आणि लाच देणारा असे दोन्ही आरोपी आहेत. तर मग समीर वानखेडे हा लाच घेणारा म्हणून तुम्ही आरोपी दाखवतात. मग लाच देणारा म्हणून आरोपी त्याची नोंद सीबीआयच्या एफआयआर मध्ये का केली नाही ?' असा प्रश्न जेष्ठ वकील आबाद फोंडा यांनी न्यायमूर्ती एस गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर उपस्थित केला आहे.

याचिकेमध्ये सुधारणा करण्याची परवानगी दिली : समीर वानखेडे यांच्या वकीलानी एनसीबीचे प्रतिज्ञापत्र हे निराधार असल्याची बाब देखील या ठिकाणी मांडली. या आरोपावर एनसीबी कडून तात्काळ आक्षेप देखील घेण्यात आला आहे. वकिल प्रतिभा जगताप यांनी आबाद फोंडा यांच्या मुद्द्यांवर आक्षेप घेतला. सर सीबीआयचे वकील कुलदीप पाटील यांनी महत्त्वाचा मुद्दा खंडपीठांसमोर आणला की, समीर वानखेडे दर सुनावणीमध्ये नवीन नवीन मुद्दे याचिकेमध्ये नमूद करत आहेत. त्यामुळे त्यांना हे थांबवायला सांगावे. यानंतर समीर वानखेडे यांच्या वकिलांनी याचिकेमध्ये सुधारणा करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली आहे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने समीर वानखेडे यांना याचिकेमध्ये सुधारणा करण्याची परवानगी देखील दिली. आणि पुढील सुनावणी २० जुलै रोजी निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांना अटके पासून २० जुलैपर्यंत दिलासा मिळालेला आहे.

हेही वाचा :

  1. Rakhi Sawant : शाहरुख खानच्या दुखापतीवर राखी सावंतची अनपेक्षित प्रतिक्रिया
  2. SPKK box office collection day 7 : 'सत्यप्रेम की कथा'ने 50 कोटींचा आकडा पार केला, एका क्लिकवर चित्रपटाचे एकूण कलेक्शन पहा
  3. Yash Drops New Look : केजीएफ स्टार यशचा भन्नाट काउबॉय लूक

ABOUT THE AUTHOR

...view details