महाराष्ट्र

maharashtra

शोयब मलिकने दिल्या बर्थ डे गर्ल सानिया मिर्झाला शुभेच्छा

By

Published : Nov 15, 2022, 12:58 PM IST

टेनिस स्टार सानिया मिर्झा आज आपला 36 वा वाढदिवस निवडक मित्रांसोबत साजरा करत आहे. या पार्टीमध्ये तिचा पती शोएब मलिक असणार नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात बिनसल्याचे व ते विभक्त होणार असल्याची चर्चा रंगली असताना शोयबने सानियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शोयब मलिकने दिल्या बर्थ डे गर्ल सानिया मिर्झाला शुभेच्छा
शोयब मलिकने दिल्या बर्थ डे गर्ल सानिया मिर्झाला शुभेच्छा

मुंबई - आज सानिया मिर्झाचा 36 वा वाढदिवस आहे. भारतीय टेनिस स्टारने तिचा वाढदिवस तिच्या मित्रांसह साजरा करायचे ठरवले आहे. या पार्टीमध्ये तिचा पती शोएब मलिक असणार नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात बिनसल्याचे व ते विभक्त होणार असल्याची चर्चा रंगली असताना शोयबने सानियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पाकिस्तानी क्रिकेटर व सानियाचा पती शोयब मलिकने शुभेच्छा देताना लिहिले, "सानिया, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आनंदी आणि आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहे. हा दिवस भरपूर एन्जॉय कर." शोएब मलिकच्या या ट्विटला उत्तर देताना एका यूजरने लिहिले की, 'हे ग्रीटिंग वाचल्यानंतर पतीने पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत असे वाटत नाही. पण तरीही अल्लाहला प्रार्थना की तुमच्याबद्दल पसरलेल्या बातम्या चुकीच्या ठरोत.

घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत सानियाचे अभिनंदन केले, खरे. परंतु शोएबच्या बोलण्यात कसलाही रोमांच, थ्रिल आणि उत्साह नव्हता.

सानियाच्या वाढदिवसानिमित्य सेलेब्रिटींच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. प्रसिद्ध फिल्ममेकर फराह खान, गायिका अनन्या बिर्ला यांनी या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सानिया मिर्झा आणि फराह खान अनेक वर्षांपासूनच्या मैत्रिणी आहेत. 2017 मध्ये करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये दोघे एकत्र दिसले होते. फराहने इन्स्टाग्रामवर सानिया मिर्झाच्या वाढदिवसाच्या पार्टीतील आतली दृश्ये दाखवणारी एक पोस्ट शेअर केली आहे. फराहने कॅप्शन दिले, "हॅपी बर्थडे माय डार्लिंग सानिया मिर्झा. या वर्षी फक्त तुझ्यासाठी आनंद आणि प्रेम आहे. सानियाच्या आईलाही वाढदिवसाच्या शुभेच्छा. वाढदिवस शेअर करण्यासाठी सर्वोत्तम व्यक्ती."

भारताची लोकप्रिय गायिका अनन्या बिर्ला हिनेही तिच्या इंस्टाग्राम हँडलवर वाढदिवसाच्या पार्टीची झलक शेअर केली. ही पार्टी दुबईत झाली. तसे, हे नमूद करणे आवश्यक आहे की भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांनी 2010 मध्ये एकमेकांशी लग्न केले होते. 30 ऑक्टोबर 2018 रोजी या जोडप्याने मुलगा इझान मिर्झा मलिकचे त्यांच्या आयुष्यात स्वागत केले.

दरम्यान, सानिया मिर्झा आणि शोयब मलिक विभक्त होणार असल्याच्या अफवांना ऊत आला आहे. दोघांनीही याबद्दल अधिकृत सांगितले नसले तरी सोशल मीडियावरील त्यांच्या प्रतिक्रियांवरुन हा तर्क लावण्यात येत आहे. दरम्यान दोघेही उर्दूफ्लिक्सवर मिर्झा मलिक शोमध्ये एकत्र झळकणार आहेत. याचे पोस्टर नुकतेच लॉन्च करण्यात आले आहे.

हेही वाचा -स्पॅनिश चित्रपट 'कॅम्पिओन्स'च्या रिमेकमध्ये पडद्यामागे राहणार आमिर खान

ABOUT THE AUTHOR

...view details