महाराष्ट्र

maharashtra

'टायगर 3'मधील सलमान खाननं शाहरुख खानसोबतच्या केमिस्ट्रीबद्दल सांगताना केला 'हा' खुलासा

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 4:41 PM IST

Salman Khan SRK Chemistry: 'पठाण' आणि 'टायगर 3'मध्ये शाहरुख खानसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान म्हटलं की, त्यांची ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीपेक्षा चांगली आहे. दरम्यान 'टायगर 3'मधील किंग खानचा कॅमियो चाहत्यांना आवडला आहे.

Salman Khan SRK Chemistry
सलमान खान आणि शाहरुख खानची केमिस्ट्री

मुंबई - Salman Khan SRK Chemistry : बॉलीवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या 'टायगर 3'मुळं चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये कॅमियो अभिनेता शाहरुख खान आणि हृतिक रोशन केला आहे. किंग खान आणि भाईजानची एक मजबूत फॅन फॉलोइंग आहे. सलमान आणि शाहरुख खान या वर्षाच्या सुरुवातीला रिलीज झालेल्या 'पठाण'मध्ये देखील एकत्र दिसले होते. 'टायगर 3'च्या यशानंतर सलमान खान हा मीडियाला भेटाला, त्यानंतर त्यानं यादम्यान अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. याशिवाय त्यानं शाहरुख खानसोबतच्या केमिस्ट्रीबद्दलही चर्चा केली. 'टायगर 3' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे.

शाहरुखसोबतच्या केमिस्ट्रीवर भाईजननं म्हटलं : 'पठाण' चित्रपटानंतर 'टायगर 3'मध्ये शाहरुख खानसोबत काम करण्याच्या अनुभवावर सलमान खान सांगितलं, 'आमची ऑफस्क्रीन केमिस्ट्री ऑनस्क्रीन केमिस्ट्रीपेक्षा चांगली आहे. आता ऑनस्क्रीन केमिस्ट्री इतकं छान दिसत असताना ते ऑफस्क्रीनवर कशी असेल हे तुम्ही समजू शकता'. या चित्रपटामध्ये सलमान खान, शाहरुख खान कटरीना कैफ, इमरान हाश्मी, रिद्धी डोगरा, आशुतोष राणा आणि इतर कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे. हा चित्रपट जगभरात वादळ निर्माण करत आहे. या चित्रपटातील गाणी देखील अनेकजणांना आवडली आहेत.

यशराज फिल्म्सचे स्पाय युनिव्हर्स :यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समध्ये सलमान खान, शाहरुख खान आणि हृतिक रोशन एकत्र दिसले आहेत. 'पठाण'मध्ये सलमान खान टायगरच्या भूमिकेत कॅमिओ करताना दिसला, तर 'टायगर 3'मध्ये शाहरुख खान 'पठाण'च्या भूमिकेत दिसला आहे. दोन्ही कलाकारांना दोन्ही चित्रपटात एकत्र पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आणि आता सोशल मीडियावरही याबद्दल उत्साह पाहायला मिळत आहे. याआधी शाहरुख-सलमान 'ट्यूबलाइट', 'झिरो' आणि 'कुछ कुछ होता है' चित्रपटांमध्येही एकत्र दिसले आहेत. हा चित्रपट देशांतर्गत लवकरच 300 कोटीचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.जभरात या चित्रपटानं 400 कोटीहून अधिकची कमाई केली आहे. या चित्रपटाचा क्रेझ जगभर आहे.

हेही वाचा :

  1. 'वीकेंड का वार'वर सनी लिओनीची झाली एंट्री, वाइल्डकार्ड एंट्री म्हणून ओरी बिग बॉसच्या घरात दाखल
  2. वेंडिंग प्लॅनबद्दल विचारण्यात आल्यानंतर विजय वर्मानं दिली 'ही' प्रतिक्रिया
  3. अगस्त्य नंदासोबत केलेल्या डान्समुळं सुहाना खान झाली ट्रोल, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details