महाराष्ट्र

maharashtra

Rohit Shetty on Cirkus failure : 'सर्कस'च्या अपयशाची रोहित शेट्टीने स्वीकारली जबाबदारी , केले धक्कादायक खुलासे

By

Published : Jul 15, 2023, 1:59 PM IST

सर्कस, दिलवाले आणि जमीन या प्लॉप चित्रपटाची जबाबदारी रोहित शेट्टीने स्वतः घेतली आहे. नेमके कुठे चुकले याचे आत्मचिंतन करुन पुढील निर्मितीकडे वळतो, असे तो म्हणाला.

Rohit Shetty on Cirkus failure
सर्कसच्या अपयशाची रोहित शेट्टीने स्वीकारली जबाबदारी

मुंबई - बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये हुकमी यश मिळवणाऱ्या निर्माता दिग्दर्शकांमध्ये राहित शेट्टीचा समावेश होतो. त्याने आजवर गोलमाल फ्रँचाइज आणि 'सिंघम', 'सिम्बा' यासारख्या कॉप मुव्हीज यशस्वीरित्या बनवल्या आहेत. मात्र अलिकडे त्याने बनवलेला 'सर्कस' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळला. हा चित्रपट विल्यम शेक्सपिअरच्या 'द कॉमेडी ऑफ एरर्स' या नाटकावर आधारित होता.

'सर्कस' चित्रपटात रणवीर सिंग, वरुण शर्मा, पूजा हेगडे आणि जॅकलिन फर्नांडिस या कालाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. २०२२ च्या डिसेंबरमध्ये रिलीज झालेला हा चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ का फिरवली याबद्दल बोलताना रोहित शेट्टी म्हणाला की, 'प्रमाणिकपणे सांगयाचे तर हे माझ्यासाठी चकित करणारे होते. पण तुम्हाला नेमके कुठे चुकले यावर आत्मचिंतन केले पाहिजे आणि जबाबदारी घेतली पाहिजे. तुम्ही यावर काम करा आणि पुढे गेले पाहिजे.'

बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेला सर्कस हा काही पहिला सिनेमा नाही आणि रोहित शेट्टीने सांगितले की त्याच्याकडे वास्तववादी दृष्टीकोन असल्यामुळे हा काही त्याचा अखेरचा सिनेमा नाही. 'माझा 'जमीन' हा पहिला चित्रपट फारशी चांगली कामगिरी करु शकला नव्हता, 'संडे' अपयशी ठरला होता आणि 'दिलवाले' चित्रपटही चांगला चालला नव्हता. आता हे चौथ्यांदा घडलंय. २५ ते ३० चित्रपट बनवण्याचे माझे लक्ष्य असून यातील आणखी तीन चार चित्रपट 'सर्कस'सारखे बनू शकतात.', असे रोहित पुढे म्हणाला.

रोहित शर्माला बॉलिवूडमध्ये २० वर्षे पूर्ण झाली आहेत. याकाळात त्याला प्रेक्षकांनी स्वीकारल्याबद्दल त्याने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. 'हा एक अद्भूत असा प्रवास होता. मी जेव्हा माझा पहिला सिनेमा 'जमीन' किंवा 'गोलमाल' हा दुसरा सिनेमा सुरू केला तेव्हा मी इथपर्यंत पोहोचू शकेन अथवा माझे चित्रपट ब्रँड बनतील, असा विचारही केला नव्हता', असे तो म्हणाला.

'या देशात कॉप युनिव्हर्स मी पहिल्यांदा सुरू करणारा असेन, असे मला कधीही वाटले नव्हते. 'खतरों की खिलाडी' सारखा टीव्ही शो मी होस्ट करु शकेन असे कधीही वाटले नव्हते. माझे मन, शक्ती आणि जिव्हाळा मी जे काही केले त्यासाठी पणाला लावला. या २० वर्षाच्या पुढे काय करता येईल हे मी पाहात आहे', असे तो म्हणाला.

रोहित शेट्टी आता 'खतरों की खिलाडी' शोचा १३ वा सिझन होस्ट करणार आहे. स्टंटवर आधारित असलेल्या या शोमध्ये सेलेब्रिटी भितीचा सामना करताना दिसतील. 'प्रत्येक सिझन प्रमाणे हा शो मोठा आणि अधिक रंजक असणार आहे. हा सो पूर्वीच्या सिझनहून खूप भव्य असेल. यातील काही स्टंट्स हे पूर्णपणे नवे असतील, त्यामुळे मुलांना पाहताना मजा येईल', असे निर्माता रोहित शेट्टी म्हणाला.

'खतरों की खिलाडी' या शोच्या नवीन सिझनचे शुटिंग दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊनमध्ये पार पडणार आहे. शिव ठाकरे, रोहित रॉय, डेसी शाह, रश्मित कौर, दिने जेम्स, अंजली गौतम, अरिजीत तनेजा, रुही चतुर्वेदी, अंजुम फकीह, अंजली आनंद, न्यार्रा एम बॅनर्जी, ऐश्वर्या शर्मा आणि सौंदस मौफकीर हे स्पर्धक यंदाच्या सिझनचे आकर्षण असतील. कलर्स वाहिनीवरुन या शोचे शनिवार पासून प्रसारण सुरू होईल.

हेही वाचा -

१.Vicky Kaushal and Katrina Kaif : वाढदिवस साजरा करण्यासाठी विक्की कौशल पत्नी कतरिना कैफसह निघाला परदेशी...

२.Baipan bhari deva IMDB rating : 'बाईपण भारी देवा'च्या रेटिंगने 'पठाण'ला मागे टाकले, कमाईचे आकडे पाहून जग अचंबित

३.Ravindra Mahajani Passed Away : 'झुंज' संपली, मराठी चित्रपटसृष्टीचा 'देवता' काळाच्या पडद्याआड; अभिनेते रवींद्र महाजनींचा बंद घरात आढळला मृतदेह

ABOUT THE AUTHOR

...view details