महाराष्ट्र

maharashtra

Raj Kundra : 'यूटी69'चा ट्रेलर रिलीजनंतर राज कुंद्रा पहिल्यांदाच विमानतळावर मास्कशिवाय दिसला; पहा व्हिडिओ...

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2023, 2:47 PM IST

Raj Kundra : राज कुंद्राचा आगामी चित्रपट 'यूटी69'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर राज कुंद्रा विमानतळाबाहेर स्पॉट झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो मास्कशिवाय दिसत आहे.

Raj Kundra
राज कुंद्रा

मुंबई - Raj Kundra Mask Man: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा नेहमीच चर्चेत असतो. दरम्यान राज कुंद्रा गुरुवारी सकाळी विमानतळावर दिसला. तुरुंगातून सुटल्यानंतर राज कुंद्रा पहिल्यांदाच मास्कशिवाय मीडियासमोर झळकला आहे. पापाराझींनी त्याला मास्कशिवाय कॅमेऱ्यात कैद केलंय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राज हा ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दिसतोय. यावर त्यानं काळ्या रंगाचा श्रग परिधान केला आहे. लूकला आणखी खास बनविण्यासाठी त्यानं डोळ्यावर सनग्लास लावला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर यूजर्स त्याच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरनं प्रतिक्रिया देत त्याच्या व्हिडिओवर लिहिलं, 'गरीब चित्रपटांचा दिग्दर्शक.' दुसऱ्या एका यूजरनं लिहलं, 'प्रत्येक माणसाकडून चुका होतात, याचा अर्थ असा नाही की माणूस चुकीचा आहे.' अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत.

राज कुंद्रानं केला खुलासा :याशिवाय त्यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो मीडियाशी देखील बोलताना दिसत. 2 वर्षांनंतर राज कुंद्रानं खुलासा केला आहे की, तो चेहऱ्यावर का मास्क घालायचा. याशिवाय त्यानं आता चेहऱ्यावरून मास्क काढला याचे कारण सांगत म्हटलं. 'लोक माझ्यावर विविध कमेंट करायचे आणि म्हणायचे की त्याचा चेहरा बघण्यासारखा नाही. मी स्टार नाही, माझ्या घरात एकच तारा आहे. माझ्यासाठी हा मुखवटा स्टार बनला होता आणि आता माझा मास्क हा सपोर्ट सिस्टीम बनला आहे. मी ते नेहमी माझ्याकडे ठेवीन'. राज हा पहिल्यांदाच ट्रोलिंगवर बोलताना खूप भावूक झाला.

'यूटी69' ट्रेलर रिलीज:18 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी राज कुंद्रानं त्याच्या आगामी 'यूटी69' ( 'UT69') चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला. ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये राज कुंद्रा थोडा भावूक झाला होता. हा चित्रपट 3 नोव्हेंबरला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. राज कुंद्रावर 2021मध्ये अश्लील चित्रपट बनवल्याचा आरोप होता. त्यादरम्यान तो 2 महिने तुरुंगात होता. तेव्हा त्याची पत्नी शिल्पा शेट्टीनं त्याला सर्वाधिक साथ दिली. या चित्रपटाच्या ट्रेलरला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा :

  1. Naal 2 Bhingori song out : 'नाळ 2'मधील मनाचा ठाव घेणारं ‘भिंगोरी’ गाणं प्रदर्शित; पहा व्हिडिओ...
  2. Bigg Boss 17 : तहलका भाईची पत्नी दीपिका आर्याचा राडा, व्हिडिओ व्हायरल
  3. Tiger Shroff joins Singham Again : रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये ॲक्शन करताना दिसणार टायगर श्रॉफ

ABOUT THE AUTHOR

...view details