महाराष्ट्र

maharashtra

राज कुंद्राने त्याचा द्वेष करणाऱ्यांसाठी दिला संदेश

By

Published : Sep 10, 2022, 5:10 PM IST

9 सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरा केलेल्या राज कुंद्राने त्याचा "द्वेष" करणाऱ्यांसाठी एक संदेश शेअर केला. अश्लील व्हिडिओ तयार केल्याच्या आरोपाखाली जुलै 2021 मध्ये अटक करण्यात आलेल्या या कुंद्रा यांनी सोशल मीडियावरुन वन-लाइनरने चाहत्यांना सबुरीचा सल्ला दिला.

राज कुंद्राने त्याचा द्वेष करणाऱ्यांसाठी दिला संदेश
राज कुंद्राने त्याचा द्वेष करणाऱ्यांसाठी दिला संदेश

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती ( Shilpa Shetty's husband ) आणि उद्योगपती राज कुंद्रा ( Raj Kundra ) यांचा 9 सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरा झाला. त्याच्या वाढदिवशी राजने सोशल मीडियावर वन-लाइनरद्वारे आपला तिरस्कार करणाऱ्यांना शांत राहण्याचा सल्ला सोशल मीडियावर दिला. एकेकाळी सोशल मीडियाचा उत्साही युजर असलेला राज पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यानंतर ग्रिडमधून बाहेर पडला. विश्रांतीनंतर, तो आता सोशल मीडियावर पुन्हा परतला आहे.

शुक्रवारी, राजने त्याच्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला ज्यामध्ये तो पूर्ण फेस मास्क आणि डेनिमच्या जोडीसह काळ्या रंगाचे हुडेड जॅकेट घातलेला दिसत आहे. संपूर्ण चेहरा झाकणाऱ्या त्याच्या विचित्र मास्कमुळे राज चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या ट्विटसह राज यांनी त्याचा "द्वेष" करणाऱ्यांसाठी एक संदेश शेअर केला.

ट्विटरवर फोटो शेअर करताना राजने लिहिले की, "मला नवीन द्वेष करणाऱ्यांची गरज आहे कारण जुने मला आवडू लागले आहेत." त्याच्या ताज्या ट्विटमुळे राजने खरोखरच अधिक द्वेष करणाऱ्यांना आमंत्रित केले. ट्विटर युजर्स राज यांना द्वेष करणाऱ्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर "ग्रह बदला" असे सुचवत आहेत. काही जण त्याला बिग बॉस 16 च्या घरात न येण्याची चेतावणी देत ​​आहेत कारण हे पाऊल उलटू शकते.

बातम्यांवर विश्वास ठेवला तर राज कुंद्राला लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉसच्या नवीन सीझनसाठी संपर्क साधण्यात आला आहे. एका सूत्रानुसार, राज आणि शोचे निर्माते यांच्यात चर्चा सुरू आहे आणि तो बिग बॉस 16 मध्ये सहभागी होण्याचा विचार करत आहे.

राजला जुलै 2021 मध्ये अश्लील व्हिडिओ तयार केल्याबद्दल अटक करण्यात आली होती आणि सप्टेंबरमध्ये त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता.

हेही वाचा -जबरदस्तीने सेल्फी घेतल्याने चाहत्यावर संतापला हृतिक रोशन

ABOUT THE AUTHOR

...view details