महाराष्ट्र

maharashtra

पूजा हेगडेचा वर्किंग बर्थडे, शुटिंगच्या सेटवरच होणार सेलेब्रिशन

By

Published : Oct 13, 2022, 11:35 AM IST

अभिनेत्री पूजा हेगडे सध्या सलमान खान अभिनीत 'किसी का भाई किसी की जान' च्या शूटिंगमध्ये आहे आणि मुंबईत चित्रपटाच्या सेटवर तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये नृत्याचा फेरा धरत नवीन वर्षात पाऊल टाकणार आहे.

पूजा हेगडेचा वर्किंग बर्थडे
पूजा हेगडेचा वर्किंग बर्थडे

मुंबई- अभिनेत्री पूजा हेगडे सध्या सलमान खान मुख्य भूमिका साकारत असलेल्या 'किसी का भाई किसी की जान' च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. आज पूजा आपला ३२ वा वाढदिवस साजरा करत असून यासाठी तिने शूटिंगला दांडी मारलेली नाही. मुंबईत चित्रपटाच्या सेटवर तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये ती सहभागी होणार असून शूटिंगच्या सेटवरुन लाईट, कॅमेरा अॅक्शनच्या आवाजात आपल्या नवीन वर्षात पाऊल टाकणार आहे.

तिच्या वर्किंग बर्थडेबद्दल बोलताना पूजा म्हणाली, "मला वाटतं, नवीन वर्षात पाऊल ठेवण्याचा यापेक्षा चांगला मार्ग असू शकत नाही, मला जे आवडतं ते करणं, शूटिंग. शिवाय सेटवर वाढदिवसाची एक वेगळीच मजा असते. या चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळी बाजू पाहायला मिळेल. मी त्याच्या रिलीजची वाट फार काळ पाहू शकत नाही!"

'किसी का भाई किसी की जान' हा फरहाद सामजी दिग्दर्शित अ‍ॅक्शन-पॅक एंटरटेनर आहे, ज्यांनी यापूर्वी अक्षय कुमार आणि क्रिती सॅनन-स्टार 'बच्चन पांडे' चे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात दग्गुबती व्यंकटेश देखील मुख्य भूमिकेत आहेत. सलमान खान फिल्म्स निर्मित, 'किसी का भाई किसी की' जान 2022 च्या शेवटी रिलीज होणार आहे.

पूजा रणवीर सिंगसोबत 'सर्कस', महेश बाबूसोबत 'SSMB28' आणि विजय देवरकोंडासोबतच्या चित्रपटातही दिसणार आहे.

हेही वाचा -लग्नात अडचणी असल्याच्या अफवांवर दीपिका पदुकोणचा खुलासा

ABOUT THE AUTHOR

...view details