महाराष्ट्र

maharashtra

Parineeti Chopra : लग्नानंतर पहिल्यांदाच परिणीती चोप्रा केला रॅम्प वॉक ; व्हिडिओ आणि फोटो झाले व्हायरल...

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 5:31 PM IST

Parineeti Chopra : परिणीती चोप्रा सध्या चर्चेत आली आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच परी रॅम्प वॉक करताना लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिसली. तिचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Parineeti Chopra
परिणीती चोप्रा

मुंबई - Parineeti Chopra : परिणीती चोप्रा ही तिच्या लग्नामुळे खूप चर्चेत होती. दरम्यान आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. लग्नापासूनच चाहते तिच्या प्रत्येक लूकची वाट पाहत असतात. एअरपोर्टवर स्पॉट झाल्यानंतर आता तिचा रॅम्प वॉक लूक समोर आला आहे. लॅक्मे फॅशन वीकच्या चौथ्या दिवशी जेव्हा परीनं रॅम्पवर वॉक केला, तेव्हा चाहते तिच्या लूकचं कौतुक थांबवू शकले नाहीत. आता तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटो आणि व्हिडिओमध्ये ती खूप खास दिसत आहे.

परिणीती चोप्राने लग्नानंतर पहिल्यांदाच रॅम्प वॉक केला : परीचे रॅम्प वॉकचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यात तिच्या लूकचे खूप कौतुक होत आहे. लग्नानंतर परिणीती पहिल्यांदाच फॅशन शोमध्ये दिसली आहे. पेस्टल रंगाची साडी, गळ्यात हार, मांग सिंदूर आणि हातात बांगड्यासह ती या शोमध्ये झळकली. या लूकमुळे तिनं सर्वांची मनं जिंकली आहेत. परीचे हे फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी परीचे कौतुक केले आहे. एका युजरनं व्हिडिओवर कमेंट करत लिहले, 'परी या लूकमध्ये खूप खास दिसत आहे'. दुसऱ्या एकानं लिहलं की, 'तिचे लग्न हे खूप जबरदस्त होते'. अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत.

परिणीती झाली ट्रोल : याशिवाय काही सोशल मीडिया यूजरनं परीला ट्रोल देखील केले आहे. एका यूजरनं कमेंट करत लिहले, 'हा सिंदूर फक्त चार दिवसांचा आहे.' दुसऱ्या यूजरनं लिहिले की, 'लग्नाला काही दिवस झाले आहेत आणि ती खूप जाड झाले आहे. आणखी एकानं लिहलं, 'आधीच परी ही जाड आहे. त्यात तिनं साडी घातली ही खूप ओल्ड वाटत आहे'. अशा देखील या व्हिडिओवर कमेंट येत आहेत. परीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा 'मिशन राणीगंज ' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर दाखल झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अक्षय कुमार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details