महाराष्ट्र

maharashtra

'द काश्मीर फाईल्स'बद्दल नदाव लॅपिड्सच्या विधानाला इतर आंतरराष्ट्रीय ज्युरींचा पाठींबा

By

Published : Dec 5, 2022, 11:31 AM IST

५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) समारोप प्रसंगी ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड्स यांनी विवेक अग्निहोत्रीच्या 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाला व्हल्गर प्रपोगंडा चित्रपट म्हटले होते. आता या महोत्सवातील इतर आंतरराष्ट्रीय ज्युरींनीही नदाव लॅपिड्स यांच्या विधानाला पाठिंबा दिला आहे.

ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड्स
ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड्स

मुंबई- ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) समारोप प्रसंगी ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड्स यांनी विवेक अग्निहोत्रीच्या 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाला व्हल्गर प्रपोगंडा चित्रपट म्हटले होते. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. आता या महोत्सवातील इतर आंतरराष्ट्रीय ज्युरींनीही नदाव लॅपिड्स यांच्या विधानाला पाठिंबा दिला आहे.

ऑस्कर-नामांकित निर्माती आणि अॅनिमेशन उद्योगासाठी सल्लागार, जिंको गोटोह यांनी ट्विटरवर इतर आंतरराष्ट्रीय ज्युरी फ्रेंच चित्रपट संपादक पास्केल चॅव्हन्स आणि फ्रेंच डॉक्युमेंटरी फिल्ममेकर जेव्हियर अँगुलो बार्चुरेन यांनी स्वाक्षरी केलेले निवेदन प्रसिध्द केले आहे. या विधानाने अधोरेखित केले आहे की ज्यरी अध्यक्ष लॅपिड यांनी चित्रपटाबद्दल काय म्हटले आहे याची कल्पना सर्व ज्युरींना होती व ते त्याला सहमत होते.

"फेस्टिव्हलच्या समारोप समारंभात, ज्युरीचे अध्यक्ष, नदाव लॅपिड यांनी ज्युरी सदस्यांच्या वतीने एक विधान केले: 'आम्ही सर्वजण 'द काश्मीर फाइल्स' या १५व्या चित्रपटाने व्यथित झालो आणि धक्का बसला, जो आम्हाला एकसारखा वाटला. हा चित्रपट आम्हाला व्हल्गर प्रपोगंडा चित्रपट, अशा प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाच्या कलात्मक स्पर्धात्मक विभागासाठी अयोग्य.'

आम्ही ज्युरीचे अध्यक्ष, नदाव लॅपिड यांच्या भूमिकेवर ठाम आहोत, असे ज्युरींनी निवेदनात म्हटले आहे. ज्युरींनी चित्रपटाच्या गुणवत्तेवर केवळ कलात्मक विधान केले आहे आणि त्यात कोणताही राजकीय पवित्रा घेण्याचा हेतू नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

"आणि स्पष्ट करण्यासाठी, आम्ही चित्रपटाच्या आशयावर राजकीय भूमिका घेत नव्हतो, आम्ही एक कलात्मक विधान करत होतो आणि उत्सवाच्या व्यासपीठाचा राजकारणासाठी आणि त्यानंतर नदाव यांच्यावर वैयक्तिक हल्ले होत असल्याचे पाहून आम्हाला खूप वाईट वाटते. ज्युरींचा हा हेतु कधीच नव्हता.," असे ज्युरींनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा -Hansika Motwani Weeding : हंसिका मोटवानीचा जयपूरमधील किल्ल्यात शाही थाटात विवाह, पहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details