महाराष्ट्र

maharashtra

Kargil Vijay Diwas 2023: अक्षय कुमार आणि अभिषेक बच्चनने भारतीय सैन्याच्या शौर्याला केला सलाम...

By

Published : Jul 26, 2023, 4:06 PM IST

अक्षय कुमार आणि अभिषेक बच्चनने कारगिल विजय दिवस २०२३ च्या निमित्ताने शहीद जवानांची आठवण करत त्यांना अभिवादन केले आहेत. तसेच देशभक्तीवर कुठले आगामी चित्रपट येणार हे जाणून घ्या.

Kargil Vijay Diwas 2023
कारगिल विजय दिवस २०२३

मुंबई :२६ जुलै १९९९चा दिवस आपण कारगिल दिवस म्हणून साजरा करतो. या दिवशी कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्याचा पराभव करणाऱ्या आपल्या शूर जवानांच्या शौर्याला आणि हौतात्म्याला आज संपूर्ण देश श्रद्धांजली अर्पण करत आहे. पाकिस्तानवर भारताने आज विजय मिळल्याने हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. कारगिल युद्धावर अनेक चित्रपट चित्रपटसृष्टीत बनले आहेत. तसेच भारतीय चित्रपट हे वेळोवेळी आपल्या शूर जवानांच्या शौर्याची आणि पराक्रमाची दखल घेतल्याचे दिसून येते. देशाबद्दल भावना जागृत करणारे भारतीय लष्कर आणि देशभक्तीबद्दलचे चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक बनविली गेले आहेत. दरम्यान आता या कारगिल दिवसानिमित्याने बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर शहीद जवानांना अभिवादन दिले आहे.

कारगिल विजय दिवस २०२३

अक्षय कुमार आणिअभिषेक बच्चनने कले शहिदांचे स्मरण: अक्षय कुमारने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'हृदयात प्रेम आणि ओठांवर प्रार्थना, मला कारगिल युद्धात शहीद झालेल्या आमच्या वीरांची आठवण येते, तुमच्यामुळे आम्ही जगतो'. अशा आशयाची त्याने पोस्ट लिहून भारतीय शहीद जवानांना अभिवादन दिले आहेत. अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, कारगिलमध्ये शहीद झालेल्या त्या वीरांना सलाम ज्यांनी आमच्या सुरक्षेसाठी वीरगती गाठली.

बॉलिवूमधील येणारे देशभक्तीवर चित्रपट : सॅम बहादूर : विक्की कौशल स्टारर चित्रपट सॅम बहादूर चालू वर्षाच्या १ डिसेंबरला रिलीज होणार आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात विक्की कौशल भारतीय लष्कराचे फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्यांना सॅम बहादूर म्हणून ओळखले जात होते. १९७१ मध्ये भारत-पाक युद्धादरम्यान ते लष्करप्रमुख होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने हे युद्ध जिंकले होते.

'ए वतन मेरे वतन' चित्रपट :सारा अली खान पहिल्यांदाच देशभक्तीपर चित्रपटात दिसणार आहे. साराच्या संदर्भात 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटाची घोषणा फार पूर्वीच झाली आहे. या चित्रपटात ती महिला स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. चित्रपटाची कथा १९४२ मधील भारत छोडो आंदोलनावर आधारित आहे. उषा मेहता गुप्तहेर बनून देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान दिले होते.

हेही वाचा :

  1. RARKPK Premiere : 'रॉकी और रानी...'च्या प्रीमियरला दीपिका पदुकोण अनुपस्थित; चाहत्यांना पडले प्रश्न....
  2. Pankhuri And Gautam : गौतम रोडे आणि पंखुरी अवस्थी या स्टार कपलच्या घरी पाळणा हलला; जुळ्या मुलांना दिला जन्म...
  3. Prabhas returns : 'कल्की २८९८ एडी' चित्रपटाची झलक लॉन्च केल्यानंतर प्रभास मायदेशी परतला, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details