महाराष्ट्र

maharashtra

Randeep and Lin Wedding: रणदीप हुड्डा लवकरच करणार गर्लफ्रेंड लिन लैश्रामशी लग्न

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 5:49 PM IST

Randeep and Lin Wedding: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा लवकरच त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. त्याच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. त्याचं लग्न खाजगी असणार आहे.

Randeep and Lin Wedding
रणदीप आणि लिनचं लग्न

मुंबई - Randeep and Lin Wedding:रणदीप हुड्डा हा आपल्या अभिनयानं सातत्यानं प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. तो लवकरच गर्लफ्रेंड लिन लैश्राम हिच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. परंतु रणदीप किंवा लिन यांनी त्यांच्या नात्याची जाहीरपणे पुष्टी केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार तो या महिन्याच्या शेवटी लग्न करणार आहे. मात्र, रणदीपच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. त्याचं आणि लिनचं लग्न हे खाजगी असणार आहे. या लग्नामध्ये फक्त त्यांचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. रणदीपला त्याच्या लग्नाबद्दल मीडियाला माहित होऊ द्यायचं नाही. लग्नानंतर तो याबद्दल घोषणा करणार आहे.

रणदीप हुड्डानं सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट :सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्यानं त्याच्या नात्याचा याआधी खुलासा केला होता. काही दिवसांपूर्वी रणदीपनं इन्स्टाग्रामवर आपल्या गर्लफ्रेंडसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये त्यानं लिनच्या वाढदिवसानिमित्त एक लव्ह पोस्ट शेअर करून आपल्या नात्याची पुष्टी केली होती. रणदीपची गर्लफ्रेंड ही मणिपूरची आहे. ती एक मॉडेल आहे. लिन रणदीपपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे.

या चित्रपटात रणदीप हुड्डा दिसला शेवटी :रणदीपच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो अखेर 'स्वतंत्र वीर सावरकर' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्यानं वीर सावरकरांची भूमिका साकारली होती. रणदीप हुड्डानं वीर सावरकर व्यतिरेखेसाठी खूप मेहनत घेतली होती. 'स्वतंत्र वीर सावरकर' या चित्रपटासाठी त्यानं जवळपास 26 किलो वजन कमी केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यानचं केलं आहे. याशिवाय नुकतेच रणदीपचं 'जोहराजाबी' हे गाणेही रिलीज झाले आहे. या गाण्यात त्याच्यासोबत प्रियांका चहर चौधरी दिसत आहे. रणदीप हुड्डा लवकरच 'ड्रामा अनफेअर अँड लव्हली'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री इलियाना डिक्रूझ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. Singham Again: 'सूर्यवंशी' या चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अक्षय कुमारचा 'सिंघम अगेन'मधील फर्स्ट लूक प्रदर्शित
  2. Painter om swami : चित्रकार-शिल्पकार ओम स्वामी यांनी दृष्टीहिन मुलींसाठी राबविला उत्कृष्ट उपक्रम
  3. Anushka Sharma and Virat Kohli : अनुष्का शर्मानं अनोख्या पद्धतीनं दिल्या पती विराट कोहलीला शुभेच्छा

ABOUT THE AUTHOR

...view details