महाराष्ट्र

maharashtra

Genelia Deshmukh Entry : 'रंग माझा वेगळा' मालिकेत दीपा-कार्तिकमधला दुरावा दूर करण्यासाठी जेनेलिया देशमुख घेणार पुढाकार!

By

Published : Dec 26, 2022, 12:28 PM IST

'रंग माझा वेगळा'ने नुकताच ९०० भागांचा टप्पा पार केला. सध्या मालिकेचे कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर असून दीपाविषयी कार्तिकच्या मनात असणारा गैरसमज लवकरच दूर होणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे कार्तिकच्या मनात असणारा हा गैरसमज दूर करण्यासाठी आणि निरपेक्ष प्रेमाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जेनेलिया देशमुखची (Genelia Deshmukh entry ) खास एण्ट्री होणार आहे. रितेश (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया देशमुखचा वेड सिनेमा (Ved Movie) लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Genelia Deshmukh Entry
जेनेलिया देशमुखची खास एण्ट्री

मुंबई :चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नवनवीन हातखंडे वापरले जातात. नेहमीचे इव्हेंटस् तर होतंच असतात परंतु काही वेळा अनोखे फंडे वापरले जातात. रितेश देशमुख अभिनित आणि दिग्दर्शित वेड या चित्रपटातून त्यांची पत्नी जिनिलिया देशमुख मराठी चित्रपटांमध्ये पदार्पण करीत आहे. त्या चित्रपटाचे प्रमोशन वेगळ्या रीतीने करताना जिनिलिया ने थेट एका मालिकेत एंट्री घेतलेली दिसेल. 'रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपा-कार्तिक मध्ये दुरावा निर्माण झाला आहे आणि तो दूर करण्यासाठी जिनिलिया देशमुख पुढाकार घेताना दिसणार आहे.



जेनेलिया देशमुखची खास एण्ट्री : 'रंग माझा वेगळा'ने नुकताच ९०० भागांचा टप्पा पार केला. सध्या मालिकेचे कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर असून दीपाविषयी कार्तिकच्या मनात असणारा गैरसमज लवकरच दूर होणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे कार्तिकच्या मनात असणारा हा गैरसमज दूर करण्यासाठी आणि निरपेक्ष प्रेमाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जेनेलिया देशमुखची (Genelia Deshmukh entry ) खास एण्ट्री होणार आहे. रितेश (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया देशमुखचा वेड सिनेमा (Ved Movie) लवकरच प्रदर्शित होणार आहे. निरपेक्ष प्रेम म्हणजे वेड असते. याच निरपेक्ष प्रेमाचे महत्व पटवून देणाऱ्या वेड या सिनेमाची सध्या कमालीची उत्सुकता आहे. वेड सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने जेनेलियाने महाराष्ट्राचा नंबर वन शो 'रंग माझा वेगळा' मध्ये हजेरी लावली.



सन्मानाने दीपाला पुन्हा घरी आणणार : जेनेलियासोबतचा हा भाग खास असेलच पण प्रेक्षकांना ज्या दिवसाची गेले कित्येक दिवस उत्सुकता होती तो दिवस अखेर आला आहे. कार्तिकने (Ashutosh Gokhale) दीपाच्या (Reshma shinde) चारित्र्यावर संशय घेऊन दोन्ही मुलींचा पिता होणे नाकारले. दीपाला मुलीला वाढवताना बराच संघर्ष करावा लागला. मात्र कार्तिकला आता सत्य परिस्थितीचा उलगडा झाला आहे. त्यामुळे जाहीर माफी मागत तो सन्मानाने दीपाला पुन्हा घरी आणणार आहे. दीपा-कार्तिकच्या नात्याची नव्याने सुरुवात होणार आहे. 'रंग माझा वेगळा' ही मालिका प्रसारित होते रात्री ८ वाजता स्टार प्रवाहवर.

ABOUT THE AUTHOR

...view details