महाराष्ट्र

maharashtra

शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याशेजारील जीवेश बिल्डिंगला भीषण आग

By

Published : May 10, 2022, 11:05 AM IST

शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याजवळील इमारतीला आग लागली. शाहरुखचा बंगला ज्या गल्लीत आहे त्याच गल्लीत ही इमारत आहे. या भागात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरांचा समावेश आहे.

शाहरुख खान बंगला
शाहरुख खान बंगला

मुंबई - बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या मुंबईतील 'मन्नत' या बंगल्याजवळील इमारतीला काल रात्री भीषण आग लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांद्रा (पश्चिम) येथील बँडस्टँड रोड येथील जीवेश बिल्डिंगच्या 14व्या मजल्यावर लेव्हल-2 मध्ये आग लागली. रात्रभर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. ज्या इमारतीत आग लागली त्या इमारतीचे नाव 'जीवेश' असून ही इमारत शाहरुख खानच्या मन्नतच्या घराशेजारी आहे.

शाहरुखच्या चाहत्यांसाठी सांगायचे तर शाहरुख खानचा मन्नत बंगला या घटनेतून पूर्णपणे सुरक्षित आहे. या भागात प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटींचे बंगलेही आहेत. शाहरुख खानने नुकताच आपल्या घराच्या नेम प्लेटवर खर्च केला. ही नेमप्लेट गौरी खानने स्वतः डिझाइन केली होती. मन्नत नावाच्या या नेमप्लेटवर शाहरुख खानने 25 लाख रुपये खर्च केल्याची चर्चा रंगली होती.

शाहरुख खानची पत्नी गौरी खान ही एक प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहे आणि तिने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या बंगल्या आणि घरांचे इंटिरियर डिझाइन केले आहे. गौरीही तिच्या सोशल मीडियावर तिच्या प्रोजेक्टशी संबंधित माहिती आणि फोटो शेअर करत असते.

येथे शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, नुकतेच त्याने स्पेनमध्ये त्याच्या बहुप्रतिक्षित 'पठाण' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्याचवेळी शाहरुखने बॉलीवूडमधील यशस्वी दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासोबत डंकी हा चित्रपट साईन केला आहे. शाहरुख आणि राजकुमार हिरानी पहिल्यांदाच एकाच प्रोजेक्टवर काम करणार आहेत.

हेही वाचा -इरा खानचा पूलमध्ये अनोखा वाढदिवस, पाण्यात दिल्या रोमँटिक पोज

ABOUT THE AUTHOR

...view details