महाराष्ट्र

maharashtra

ऐंशीच्या दशकातील प्रसिद्ध दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांनी घेतला जगाचा निरोप

By

Published : Oct 27, 2022, 11:12 AM IST

इस्माईल श्रॉफ यांनी घेतला जगाचा निरोप
इस्माईल श्रॉफ यांनी घेतला जगाचा निरोप

ऐंशीच्या दशकातील प्रसिद्ध दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांची. त्यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले असून सिनेमा विश्वात हळहळ व्यक्त झाली. त्यांची प्रकृती गेली अनेक महिने खराब होती आणि त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल मध्ये शेवटचा श्वास घेतला.

मुंबई- गेल्या काही महिन्यांत अनेक बॉलीवूड हस्ती जगाचा निरोप घेऊन गेल्या. कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक असे अनेक चित्रपटसृष्टीतील मोहरे जीवनपटावरून गायब झाले. यात आता अजून एकाची भर पडलीय ती म्हणजे, ऐंशीच्या दशकातील प्रसिद्ध दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांची. त्यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले असून सिनेमा विश्वात हळहळ व्यक्त झाली. त्यांची प्रकृती गेली अनेक महिने खराब होती आणि त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल मध्ये शेवटचा श्वास घेतला.

इस्माईल श्रॉफ हे मूळचे आंध्र प्रदेशचे आणि त्यांना लहानपणापासूनच सिनेमाचे वेड होते. त्यामुळे त्यांनी नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी मधून साउंड इंजीनियरिंगचा कोर्स केला होता आणि फिल्मी दुनियेत करियर करण्यासाठी मुंबईचा रस्ता धरला. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात असिस्टंट डायरेक्टर म्हणून केली होती. साधू और शैतान मध्ये ते सहाय्यक दिग्दर्शक होते.

प्रसिद्ध दिग्दर्शक भीम सिंह यांच्याकडे अनेक वर्षे असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केल्यानंतर त्यांनी स्वतःचा चित्रपट बनविला, थोडी सी बेवफाई. यात राजेश खन्ना, शबाना आझमी आणि पद्मिनी कोल्हापुरे सारखे दिग्गज कलाकार होते. त्यांच्या या पहिल्याच प्रयत्नात त्यांना भरपूर यश मिळाले कारण थोडी सी बेवफाई हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतरचे आहिस्ता आहिस्ता, बुलंदी, सूर्या सारखे अनेक चित्रपट बनविले ज्यांना भरपूर बॉक्स ऑफिस यश मिळाले.

दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांनी आपल्या हयातीत साधारण पंधराएक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आणि २००४ साली प्रदर्शित झालेला 'थोड़ा तुम बदलो थोड़ा हम' हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.

हेही वाचा -महेंद्रसिंग धोनीच्या प्रॉडक्शनचा पहिला चित्रपट बनणार तामिळमध्ये

ABOUT THE AUTHOR

...view details