महाराष्ट्र

maharashtra

Deepika Padukone : दीपिका पदुकोणच्या फोटोवर आलिया भट्टने दिली प्रतिक्रिया...

By

Published : Jun 22, 2023, 4:39 PM IST

आंतरराष्ट्रीय योगा दिना निमित्याने दीपिका पदुकोणने तिच्या योगा पोझमधील फोटो शेअर करून चाहत्यांना एक प्रश्न विचारला, यावर आलिया भट्टने उत्तर दिले आहे. जाणून घ्या प्रश्न काय होता आणि उत्तर काय होते?

Deepika Padukone
दीपिका पदुकोण

मुंबई : 21 जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या दिवशी बॉलीवूडमधील अनेक स्टार्सने फिट राहण्यासाठी योगा केला होता. बॉलीवूड अभिनेत्रींनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योग मुद्रांचे फोटो शेअर करून चाहत्यांना योगा करण्यास प्रेरित केले होते. काल रात्री या दिनानिमित्य बॉलीवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोणने देखील इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या चाहत्यांना शुभेच्छा देऊन त्यांना प्रेरित करण्याचे काम केले आहे. यावेळी दीपिकाने तिच्या फोटोसह चाहत्यांसाठी एक प्रश्नही विचाराला आहे, ज्याचे उत्तर बॉलिवूडच्या गंगूबाई आलिया भट्टने दिले आहे.

काय होता दीपिकाचा प्रश्न? :दीपिकाने ब्लॅक वर्कआउट आउटफिटमधला तिचा फोटो शेअर करत चाहत्यांना विचारले, तुमच्यापैकी किती जणांना या आसनाचे नाव माहित आहे. आलिया भट्टने जेव्हा हा फोटो पाहिला तेव्हा तिने लगेच कमेंट बॉक्समध्ये उत्तर दिले. आलिया म्हटले - पप्पी पोझ. दीपिकाच्या या आसनावर अनेक युजर्सनी वाईट आणि मजेशीर कमेंट केल्या आहेत. या फोटोवर एका वापरकर्यांने कमेंट केली, दीपिकासन दुसऱ्याने कमेंट देत म्हटले, डॉगी पोझ सो रिलॅक्सीन, तर आणखी एकाने कमेंट देत म्हटले, नाईस वॉल पेपर अशा अनेक कमेंट या फोटोवर आल्या आहे.

आलिया चर्चेत : दीपिका आणि आलियाबद्दल सांगायचे गेले तर रणबीर कपूर आणि दीपिका हे एक्स कपल राहिले आहेत, याशिवाय रणबीरने आलिया भट्टसोबत लग्न केले आहे. दरम्यान आलिया दीपिकाचा पती रणवीर सिंगसोबत रूपेरी पडद्यावर रॉकी और रानी की प्रेम कहानी या नवीन चित्रपटाद्वारे एकत्र दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रेमकथेमुळे आलिया आणि रणवीर सध्याला चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून हा चित्रपट २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट करण जोहरने दिग्दर्शित केला आहे. करण जोहरने दीर्घ काळानंतर चित्रपट दिग्दर्शनात हात घातला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर व्यतिरिक्त जया बच्चन, प्रिती जिंट्टा, धर्मेद्र, शबाना आझमी हे देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती चालणार हे येणाऱ्या काळात समजेल.

हेही वाचा :

  1. Ranbir Kapoor spotted in new look : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुलगी राहासोबत दुबईला रवाना
  2. Kriti Sanon Mother: 'आदिपुरुष' चित्रपटाला समर्थन दिल्याने क्रिती सेनॉनची आई झाली ट्रोल
  3. Neeyat Trailer OUT: विद्या बालन स्टारर चित्रपट 'नीयत'चे ट्रेलर रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details