मुंबई - Prabhas Instagram Account : साऊथ अभिनेता प्रभास सध्या त्याच्या आगामी 'सालार' चित्रपटासाठी चर्चेत आहे. त्याचे चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान आता प्रभासबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रभासचे इंस्टाग्राम अकाउंट एका रात्रीतच अचानक गायब झाले आहे. यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता सध्या प्रभासचे चाहते प्रचंड तणावात आहेत. प्रभासचे इन्स्टाग्राम अकाउंट अचानक गायब झाल्यानं चाहते दु:खी झाले आहेत. प्रभासचा चाहतावर्ग खूप मोठा आहे, त्यामुळे अनेकांना त्याच्या चित्रपटांविषयी खूप उत्सुकता असते. प्रभास अनेकदा त्याचे फोटो आणि चित्रपटांविषयी प्रत्येक अपडेट त्याच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असतो.
प्रभास इंस्टाग्राम अकाउंट झाले गायब :प्रभासचे इन्स्टाग्राम अकाउंट गायब होताच ही बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे. चाहत्यांचा असा अंदाज आहे की कदाचित त्याने स्वतः अकाउंट निष्क्रिय केले असेल किंवा कोणीतरी त्यांचे अकाउंट हॅक करून हटवले असेल. काही लोक यामागचे कारण ग्लोबल हॅकिंगला देत आहेत. प्रभासचे अकाउंट हॅक करून डिलीट करण्यात आल्याचे लोकांचे म्हणणे आहे. सध्या या संदर्भात प्रभास किंवा त्याच्या टीमकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. दरम्यान प्रभासचा 'सालार' चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, मीनाक्षी चौधरी, जगपती बाबू आणि याशिवाय अनेक कलाकार दिसणार आहेत.