महाराष्ट्र

maharashtra

अमिताभ बच्चन यांनी वॉर्नर म्युझिक इंडिया कंपनीला पाच वर्षांसाठी भाड्यानं दिली 'ही' मालमत्ता

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 30, 2023, 5:06 PM IST

Amitabh Bachchan : अभिनेता अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील ओशिवरा परिसरातील व्यावसायिक टॉवरमधील त्यांच्या चार कार्यालयीन मालमत्ता वॉर्नर म्युझिक इंडिया कंपनीला पाच वर्षांसाठी भाड्यानं दिल्या आहेत.

Amitabh Bachchan
अमिताभ बच्चन

मुंबई - Amitabh Bachchan : हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार्स घराऐवजी व्यावसायिक मालमत्तेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. मुंबईत व्यावसायिक मालमत्तेचं भाडं जास्त आहे. दरम्यान अलीकडेच दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांनी वॉर्नर म्युझिक इंडिया लिमिटेडला पाच वर्षांसाठी भाडेतत्त्वावर त्यांची मालमत्ता दिली आहे. 'बिग बी'ची ही मालमत्ता ओशिवरा भागात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही जागा 10,000 चौरस फूट कार्पेट एरियाची आहे. याशिवाय आता ओशिवरा येथील एका व्यावसायिक टॉवरमध्ये अजय देवगण आणि काजोल, शाहरुख खान, शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यासह अनेक बॉलिवूड अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शकांनी गुंतवणूक केली आहे.

अमिताभ बच्चनची मालमत्ता : अमिताभ यांनी ऑगस्ट 2023 मध्ये या चार व्यावसायिक मालमत्ता खरेदी केल्या होत्या. मात्र या व्यवहाराबाबत अमिताभ यांची टीम आणि वॉर्नर म्युझिक इंडियाकडून अद्याप कोणतंही अधिकृत विधान समोर आलेलं नाही. बच्चन कुटुंबाकडे मुंबईत अनेक मालमत्ता आहेत आणि अलीकडेच अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांनी त्यांची मुलगी श्वेता नंदाला मुंबईतील जुहू भागात 'प्रतीक्षा' हा आलिशान बंगला भेट म्हणून दिला आहे. मनीकंट्रोलनुसार, ही लीज मार्च 2024 पासून सुरू होणार आहे.

कराराचा संपूर्ण तपशील : भाडे करारात तीन वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे. याशिवाय 12 पार्किंग स्लॉट देण्यात आले आहेत. 12 पैकी चार पार्किंग स्लॉट्स हाय-एंड लक्झरी गाड्यांसाठी असतील. एका रिपोर्टनुसार, भाडे करारामध्ये पुढील दोन वर्षांत भाडे 15 टक्क्यांनी वाढवण्याचं समाविष्ट आहे. या मालमत्तेचं भाडं 2.07 कोटी रुपये आहे. वॉर्नर म्युझिक इंडिया लिमिटेडनं 8 डिसेंबर रोजी व्यवहाराच्या नोंदणीच्या वेळी 1.03 कोटी रुपयांचा अ‍ॅडव्हान्स दिला आहे. याशिवाय ही मालमत्ता दोन भूखंडांमध्ये विभागली आहे. एका विभागचं क्षेत्रफळ 9,585 चौरस फूट आहे. याचं वर्षाचं भाडे 31.39 कोटी रुपये असेल, तर दुसऱ्या भागातली जागा 7,254 चौरस फूट असून भाडं 19.24 कोटी रुपये आहे.

हेही वाचा :

  1. रणदीप हुडा पत्नी लिन लैशरामसह नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी केरळला झाला रवाना
  2. नवविवाहित अरबाज खान आणि शशूरा खान नव्या वर्षाच्या स्वागतासाठी विमानाने रवाना
  3. 'डंकी' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा केला पार

ABOUT THE AUTHOR

...view details