महाराष्ट्र

maharashtra

Alia Bhatt And Ranveer Singh : आलिया भट्ट आणि रणवीर सिंग उत्तर प्रदेशला झाले रवाना, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चे करणार प्रमोशन

By

Published : Jul 22, 2023, 2:51 PM IST

आलिया आणि रणवीर त्यांच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उत्तर प्रदेशला रवाना झाले आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनला जात असताना दोघेही खास लूकमध्ये मुंबई विमानतळावर दिसले.

Alia Bhatt And Ranveer Singh
आलिया भट्ट आणि रणवीर सिंग

मुंबई : बॉलिवूड स्टार रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा रोमँटिक ड्रामा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' रिलीज होण्यास काही दिवस बाकी आहेत. देशभरातील विविध प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचे प्रमोशन केले जात आहेत. मुंबईतील मनीष मल्होत्राच्या वधूच्या कलेक्शनचे अनावरण केल्यावर ही जोडी त्यांच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र झाली आहे. दरम्यान आता रणवीर आणि आलिया त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी शनिवारी उत्तर प्रदेशसाठी रवाना झाले आहे. रणवीर आणि आलिया आता 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या प्रमोशनसाठी कानपूर आणि बरेलीला जात आहेत. ही जोडी शनिवारी सकाळी मुंबईच्या कलिना विमानतळावर दिसली.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाचे प्रमोशन :चित्रपटाच्या प्रमोशनला जात असताना रणवीर काळ्या रंगाच्या ट्रेच कोटमध्ये होता. याशिवाय त्याने यावर एक पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट आणि काळ्या रंगाच्या हिरव्या पट्टीसह पॅन्ट घातला होता. या लूकला आणखी खास बनविण्यासाठी त्याने काळ्या रंगाचा सनग्लास आणि मास्क घातला होता. या लूकमध्ये तो खूप देखणा दिसत होता. दुसरीकडे, आलियाने गुलाबी रंगाचा स्वेटशर्ट आणि डेनिम जीन्स परिधान केला होता. याशिवाय तिने केसांची पोनीटेल बांधली होती. या लूकमध्ये आलिया खूप सुंदर दिसत होती. तसेच आलियाच्या स्वेटशर्टवर 'टीम रॉकी आणि राणी' लिहलेले होते.

लवकरच चित्रपट थिएटरमध्ये होणार रिलीज :करण जोहर दिग्दर्शित आणि निर्मित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाचे प्रमोशन खूप जोरदार सुरू आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण वेगवेगळ्या शहरांमध्ये करणार आहेत. रणवीर आणि आलिया २०१९मध्ये झोया अख्तरच्या 'गली बॉय' चित्रपटात दिसले होते. त्यानंतर आता दोघे 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर धमाल करायला येत आहेत. रणवीर आणि आलियाचा 'गली बॉय' चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता, त्यामुळे रणवीरला या चित्रपटापासून खूप अपेक्षा आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट २८ जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हेही वाचा :

  1. Oppenheimer box office :'ख्रिस्तोफर नोलनच्या 'ओपेनहायमर'चा भारतात पहिल्या दिवशी धमाका
  2. BBD Box Office collection day 22 : 'बाईपण भारी देवा'ची २२ व्या दिवशीची छप्परफाड कमाई सुरूच !
  3. Allu Arjun : 'इथं फक्त एकाचेच राज्य चालते, पुष्पाचे राज्य', अल्लू अर्जुननेच लीक केला 'पुष्पा २'चा डायलॉग

ABOUT THE AUTHOR

...view details