महाराष्ट्र

maharashtra

Glimpse of Ram Setu : अक्षय कुमारने शेअर केली 'राम सेतू'ची पहिली झलक

By

Published : Apr 29, 2022, 10:01 AM IST

सुपरस्टार अक्षय कुमारच्या आगामी 'राम सेतू' चित्रपटाची पहिली झलक प्रसिध्द झाली आहे. हा चित्रपट येत्या दिवाळीत थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

'राम सेतू'ची पहिली झलक
'राम सेतू'ची पहिली झलक

मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने गुरुवारी त्याच्या दिवाळीत रिलीज होमार असलेल्या 'राम सेतू' चित्रपटाची पहिली झलक दाखवली आहे. हा सिनेमा या वर्षातील सर्वात प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे.

त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर अक्षयने स्वत: जॅकलिन फर्नांडिस आणि सत्य देव यांच्यासोबत एक पोस्ट शेअर केली. त्यांनी पोस्टला कॅप्शन दिले, "राम सेतूच्या जगाची एक झलक. 2022 च्या दिवाळीमध्ये थिएटरमध्ये दाखल होणार.

अक्षय कुमारच्या हातात मशाल दिसत असून शेजरी उभे असलेल्या जॅकलीनच्या हातात टॉर्च दिसत आहे तर सत्य देव त्यांच्या शेजारी उभे राहून टक लावून पाहत आहे. संपूर्ण झलक अत्यंत तीव्र दिसत असून फोटोची मूळ पार्श्वभूमी एक रहस्यमय ऐतिहासिक वातावरण निर्माण करताना दिसते.

अॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर ड्रामा असलेल्या या चित्रपटाची कथा एका पुरातत्वशास्त्रज्ञाची आहे जो पौराणिक 'राम-सेतू'चे खरे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी काळाशी झुंज देतो. हा चित्रपट भारतीय सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशात खोलवर रुजलेली कथा प्रकाशात आणेल.

अक्षय व्यतिरिक्त 'राम सेतू'मध्ये जॅकलीन फर्नांडिस, सत्यदेव आणि नुशरत भरुच्चा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अभिषेक शर्मा दिग्दर्शित आणि अरुणा भाटिया आणि विक्रम मल्होत्रा ​​निर्मित, हा चित्रपट पुढच्या वर्षी दिवाळीत रुपेरी पडद्यावर येणार आहे.

थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर, 'राम सेतू' हा चित्रपट लवकरच अमेझॉन प्राइम सदस्यांसाठी देखील उपलब्ध होईल.

हेही वाचा -विनयभंग प्रकरणी नवाजुद्दीन व कुटुंबाला कोर्टाने दिली क्लीन चिट

ABOUT THE AUTHOR

...view details