महाराष्ट्र

maharashtra

Ajaz Khan : एजाज खानने केला खुलासा, तुरुंगात आर्यन खान आणि राज कुंद्राची घेतली भेट

By

Published : Jun 29, 2023, 5:15 PM IST

बिग बॉस शोचा माजी स्पर्धक एजाज खान हा जवळपास 26 महिन्यापासून तुरुंगात होता. आता तो सुप्रीम कोर्टातून जामिनावर सुटला आहे. सुटका झाल्यानंतर त्याने आर्यन खान आणि राज कुंद्राबद्दल एक गोष्ट शेअर केली आहे.

AJAZ KHAN
एजाज खान

मुंबई : बिग बॉस टीव्ही रिअ‍ॅलिटी शोचा माजी स्पर्धक अभिनेता एजाज खानने जवळपास 26 महिने तुरुंगात काढले. सुप्रीम कोर्टातून एजाजची जामिनावर सुटका झाली आहे. सुटका झाल्यानंतर तो त्याच्या घरी गेला आहे. अलीकडेच त्याने त्याच्या तुरुंगातील प्रवासाचा अनुभव शेअर केला. दरम्यान एजाजने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांच्याबद्दलही खुलासा केला आहे. ड्रग्ज प्रकरणामुळे एजाजला तुरुंगात टाकण्यात आले होते. आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

आर्यन खान आणि राज कुंद्राची भेट :एजाज खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्याच्या अटकेवर, त्याने स्पष्ट केले की त्याच्याकडे फक्त झोपेच्या गोळ्या होत्या. ड्रग्ज प्रकरणामुळे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आर्यन खान आणि राज कुंद्रा यांची भेट झाल्याचे उघड केले. याशिवाय एजाजने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, संजय राऊत आणि अरमान कोहली यांचीही भेट घेतली असेही त्याने सांगितले. एजानने पुढे सांगितले की, त्याच्या मुलाने त्याला तुरुंगात पाहावे अशी त्यांची इच्छा नसल्यामुळे तो त्यांच्या मुलाला भेटला नाही. एजाज 6 महिन्यांनी आपल्या मुलाला भेटला आहे .असेही त्याने सांगितले. एजानने त्याच्या तुरुंगातील प्रवासावर एक पुस्तक लिहिले आहे, ज्यावर त्याला वेब-सीरीज बनवायची आहे.

एका शौचालयात 400 कैदी : जेल जर्नीमध्ये एजाजने मुंबईचे आर्थर रोड जेल हे जगातील सर्वात गर्दीचे जेल असल्याचेही सांगितले आहे. त्याने पुढे सांगितले की, या जेलची क्षमता 800 आहे आणि येथे सुमारे 3500 कैदी आहेत. अशा परिस्थितीत 400 कैद्यांसाठी एक शौचालय असल्याचा खुलासा त्याने केला. त्याने सांगितले की, माझी प्रकृती खराब होती, मी चिंता आणि तणावाखाली आलो होतो, पण मला माझ्या कुटुंबासाठी जिवंत राहावे लागले.

एजाज खान विषयी : एजान खान सलमान खानच्या बिग बॉस शोच्या ७व्या सीझनमध्ये दिसला होता. त्याने 2003 मध्ये 'पथ' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तर एकता कपूरचा शो 'क्या होगा निम्मो का' (2007), 'करम अपना अपना', 'कहानी हमारे महाभारत की' आणि 'रहे तेरा आशीर्वाद' यांसारख्या मालिकेत दिसला आहे. तसेच तो बॉलिवूड क्लब या रिअ‍ॅलिटी शोचा विजेता ठरला आहे.

  1. हेही वाचा
    Afalathoon release date : आंधळा, मुका आणि बहिऱ्या मित्रांची अतरंगी धमाल चित्रपट ‘अफलातून’!
  2. Aaneebani in Maharashtra : २८ जुलैला महाराष्ट्रात लागणार आणिबाणी
  3. Rajkummar Rao : राजकुमार राव साकारणार शहीद भगतसिंगची भूमिका...

ABOUT THE AUTHOR

...view details