महाराष्ट्र

maharashtra

Sudipto Sen announce Bastar : द केरळ स्टोरीनंतर सुदीप्तो सेन नक्षलवादावर बनवणार चित्रपट

By

Published : Jun 26, 2023, 1:06 PM IST

द केरळ स्टेरीचे निर्माते दिग्दर्शकांच्या जोडीने आगामी बस्तर या चित्रपटाची घोषणा केली आहे. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट असणार असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. हा आगामी चित्रपट येत्या एप्रिलमध्ये मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.

Sudipto Sen announce Bastar
सुदीप्तो सेन नक्षलवादावर बनवणार चित्रपट

मुंबई- वादग्रस्त चित्रपट 'द केरळ स्टोरी'च्या व्यावसायिक यशानंतर दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि निर्माते विपुल शाह यांनी त्यांच्या आगामी बस्तर चित्रपटाची घोषणा केली आहे. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट असल्याचा दावा निर्माते करत असून ५ एप्रिल २०२४ रोजी हा सिनेमा पडद्यावर रिलीज केला जाणार आहे.

बस्तर चित्रपटाची घोषणा- निर्माते विपुल शाह यांच्या सनशाइन पिक्चर्सने त्यांच्या ट्विटरवरुन या चित्रपटाची घोषणा केली आहे. 'आमच्या आगामी बस्तर चित्रपटाचे लॉन्चिंग करत आहोत. सत्य घटनेवर आधारित या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज व्हा. ५ एप्रिल २०२४ ही तारीख तुमच्या कॅलेंडरवर नोंद करुन ठेवा.' , असे सनशाईन पिक्चर्सच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ट्विटमध्ये एक पोस्टर दिसत असून जंगलाच्या पार्श्वभूमीवर वृक्ष कोशळल्याचे दिसत आहे. लाल झेंडा, बंदुक आणि घनदाट जंगलात पडलेल्या ठिणग्या दिसत असून या चित्रपटाचे कथानक नक्षलवाद्यांशी संबंधीत असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

द केरळ स्टोरीचे कथानक - द केरळ स्टोरीच्या कथेने देशभर राजकीय धृविकरण घडल्याचे पाहायला मिळाले. या चित्रपटाच्या कथानकात केरळमधील महिलांना इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी गटाने धर्मांतर करण्यास भाग पाडले आणि त्यांची भरती कशी केली हे चित्रित के होतेले. सुदिप्तो सेन द्वारे दिग्दर्शित आणि विपुल शाह निर्मित हा चित्रपट ५ मे २०२३ रोजी प्रदर्शित झाला. केरळ स्टोरीमध्ये अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी यांनी व्यक्तीरेखा साकारल्या होत्या.

वादग्रस्त केरळ स्टोरी- द केरळ स्टोरी या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करता आली. या चित्रपटावर पश्चिम बंगाल सरकारने समुदायांमधील तणावाच्या भीतीने बंदी घातली होती. तामिळनाडूतील चित्रपटगृहांनी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आणि कमी प्रेक्षकसंख्येचे कारण देत स्क्रीनिंग थांबवण्याचा निर्णय घेतला होता. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि हरियाणा या भाजपशासित राज्यांमध्येही चित्रपट करमुक्त करण्यात आला होता. व्यावसायिक यश असूनह द केरळ स्टोरीच्या निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या ओटीटी रिलीजसाठी करारावर सही केलेली नाही. मिळालेल्या बातमीनुसार निर्मात्यांना कोणत्याही ओटीटीकडून चित्रपटाच्या प्रसारणासाठी मोठी ऑफर मिळालेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details