महाराष्ट्र

maharashtra

शेहजादाचा ट्रेलर पाहून कार्तिक आर्यनच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लहर

By

Published : Jan 12, 2023, 2:13 PM IST

Updated : Jan 12, 2023, 2:35 PM IST

hehzada Trailer OUT: कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट शेहजादाच्या ट्रेलरची प्रतीक्षा अखेर संपली आहे. चित्रपटाचा धडाकेबाज ट्रेलर प्रेक्षकांच्या भरपूर मनोरंजनाची खात्री देत असल्यामुळे कार्तिकच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.

शेहजादाचा ट्रेलर
शेहजादाचा ट्रेलर

मुंबई- 'भूल भुलैया 2' या चित्रपटाच्या यशानंतर कार्तिक आर्यनच्या शेहजादा चित्रपटाची प्रतीक्षा त्याचे चाहते करत आहेत. या चित्रपटाचा धडाकेबाज ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. यातील कार्तिकची भूमिका पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. हा ट्रेलर सोशल मीडियावर येताच नेटिझन्सनी इंटरनेटवर गर्दी केली आहे. तर, बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा चित्रपट 'पठाण' 25 जानेवारीला प्रदर्शित होत असताना, 'शेहजादा'चा ट्रेलर देखील थिएटरमध्ये दिसणार आहे.

दमदार डायलॉग आणि जबरदस्त अॅक्शन फाईट्सने ट्रेलरची सुरुवात होते. कार्तिक आर्यनचा आक्रमक अवतार यात पाहायला मिळतो. परेश रावलसोबत कार्तिकची केमेस्ट्री पाहायला मिळते. मग अवतरते क्रिती सेनॉन, नखरेल अदांनी ती कार्तिकला घायाळ करते. यातील पायाचा ठेका धरायला लावणाऱ्या गाण्यावर कार्तिक आणि क्रितीला पाहणे नेत्रसुखद आहे.

ट्रेलर सुरू झाल्यानंतर कार्तिकला लक्षात येते की तो जिंदल परिवाराचा असली शेहजादा आहे आणि मग कथानक अनेक वळणे घेत पुढे सरकते. राजपाल यादव, सचिन खेडेकर, रोनित रॉय, मनिषा कोईराला यांच्या भूमिकांची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. भरपूर मनोरंजनाची हमी हा ट्रेलर देताना दिसतो.

रोहित धवन दिग्दर्शित शेहजादा - वरुण धवनचा मोठा भाऊ रोहित धवन याने 'शेहजादा' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन व्यतिरिक्त क्रिती सेनॉन, मनीषा कोईराला, परेश रावल, रोनित रॉय आणि सचिन खेडेकर आणि अंकुर राठी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

'शेहजादा' हा रोमँटिक-ड्रामा चित्रपट आहे. याआधी हा चित्रपट नोव्हेंबर २०२२ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता, पण नंतर काही कारणांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

'शेहजादा' हा अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचा रिमेक आहे - 'शेहजादा' हा दक्षिण सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 2020 चा सुपरहिट तेलगू चित्रपट अला वैकुंठापुरमुलूचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. 'आला वैकुंठपुरमुलू'मध्ये अभिनेत्री तब्बूही महत्त्वाच्या भूमिकेत होती.'शेहजादा'मध्ये कार्तिक बंटू नावाच्या व्यक्तिरेखेची भूमिका साकारणार आहे. रोहित धवन दिग्दर्शित या चित्रपटात कार्तिकसोबत क्रिती सेनॉनची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाचा फर्स्ट लूक नोव्हेंबर २०२२ मध्ये लाँच करण्यात आला होता. पहिल्या लूकमध्ये कार्तिक म्हणजेच बंटू गुंडांना मारहाण करताना दिसत आहे. यासोबतच त्यांचा एक दमदार संवादही आहे, 'जब बात फैमिली पर आ जाए तो चर्चा नहीं करते, एक्शन करते हैं.'

कार्तिकचा वर्कफ्रंट - वर्क फ्रंटवर, कार्तिक सध्या कियारा अडवाणीसोबत 'सत्यप्रेम की कथा' या संगीतमय रोमँटिक गाथा चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विध्वंस करत आहेत. हा चित्रपट 29 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय कार्तिक 'फ्रेडी' या रोमँटिक थ्रिलर चित्रपटात अभिनेत्री आलिया एफसोबत झळकला आहे. हा चित्रपट 2 डिसेंबर 2022 पासून OTT प्लॅटफॉर्म Disney + Hotstar वर विशेष प्रवाहित झाला होता. याशिवाय हेरा-फेरी-3, शहजादा आणि आशिकी-3 हे देखील कार्तिकच्या बॅगमध्ये आहेत.

हेही वाचा -'माझे हृदय अभिमानाने ओथंबले आहे' : 'वेड'च्या यशानंतर करण जोहरने केले रितेश आणि जेनेलियाचे कौतुक

Last Updated :Jan 12, 2023, 2:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details