महाराष्ट्र

maharashtra

Tamannaah Bhatia Vijay Varma : विजय वर्माची काळजी घेताना तमन्ना भाटियाचा व्हिडिओ व्हायरल...

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2023, 8:13 PM IST

Tamannaah Bhatia Vijay Varma : अभिनेत्री तमन्ना भाटिया बॉयफ्रेंड विजय वर्मासोबत एका कार्यक्रमात पोहचली होती. या कार्यक्रमात ती बॉयफ्रेंडची काळजी घेताना दिसली. सध्या या जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Tamannaah Bhatia Vijay Varma
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा

मुंबई - Tamannaah Bhatia Vijay Varma : साऊथ अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा हे त्यांच्या नात्यामुळे कायमच चर्चेत असतात. हे जोडपे अनेकदा एकत्र बाहेर फिरताना दिसतात. दरम्यान आता या कपलला आणखी एका कार्यक्रमात एकत्र पाहिल्या गेलं आहे. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या दोघांमधील केमिस्ट्री ही जबरदस्त दिसत आहे. तमन्ना भाटिया बॉयफ्रेंड विजय वर्मासोबत एका कार्यक्रमात पोहोचली. या कार्यक्रमामध्ये ती आपल्या बॉयफ्रेंडवर प्रेमाचा वर्षाव करताना आणि त्याची काळजी घेताना दिसली.

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा झाले एकत्र स्पॉट : या व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करून या कपलचे कौतुक करत आहेत. व्हिडिओमध्ये तमन्ना आणि विजय एकत्र दिसत आहेत. दरम्यान विजयनं परिधान केलेला बॅच हा खाली पडला त्यानंतर तमन्ना खाली वाकते आणि तो बॅच उचलते. त्यानंतर ती तो बॅच विजयच्या ड्रेसवर लावते. या दोघांचा हा सुंदर बॉन्ड चाहत्यांना खूप आवडला आहे. व्हिडिओमध्ये तमन्नाची ही बॉयफ्रेंडविषयी काळजी पाहून चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर एका सोशल मीडिया यूजरनं लिहलं की, 'हे कपल एकत्र खूप सुंदर दिसत आहे'. दुसऱ्या एकानं लिहलं, 'खूप सुंदर'. आणखी एकानं लिहल, 'या जोडप्यांनी लवकर लग्न केले पाहिजे'. अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

तमन्ना आणि विजयचं लूक :तमन्नानं व्हिडिओमध्ये बॉल फ्लोर गाऊन घातला आहे. यावर तिनं न्यूड मेकअप केला आहे. यासह तिनं हार्ट डिजाइनचे इयररिंगसह हिल्स घातली आहे. या लूकमध्ये ती खूप खास दिसत आहे. दुसरीकडे विजय वर्मानं ग्रे रंगाचे टी-शर्टसह जॅकेट घातले आहे. यावर त्यानं काळ्या रंगाचा पॅन्ट परिधान केला आहे. याशिवाय त्यानं सनग्लास लावला आहे. या कार्यक्रमामध्ये या जोडप्यानी फोटोसाठी सुंदर पोझ दिली आहे. तमन्ना आणि विजय 'लस्ट स्टोरीज 2'मध्ये एकत्र दिसले होते. या चित्रपटादरम्यानच ते प्रेमात पडले होते.

हेही वाचा :

  1. Leo Movie : थलपथी विजयच्या 'लिओ'चं वाजत गाजत स्वागत; थिएटर बाहेरचा व्हिडिओ व्हायरल...
  2. Scam 2003 The Telgi Story Volume 2 : 'स्कॅम २००३ द तेलगी स्टोरी'चे उर्वरित भाग होणार प्रसारित, रिलीज तारखेची झाली घोषणा
  3. Arijit Singh sings for Salman : सलमानच्या 'टायगर 3' चं पहिलं गाणं, पहिल्यांदाच अरिजित सिंगच्या आवाजात

ABOUT THE AUTHOR

...view details