महाराष्ट्र

maharashtra

Jacqueline Fernandez : मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला जामीन मंजूर

By

Published : Nov 15, 2022, 4:32 PM IST

Updated : Nov 15, 2022, 5:12 PM IST

मनी लाँड्रिंग प्रकरणात ( money laundering case) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) पतियाळा हाऊस कोर्टातून जामीन मिळाला आहे. जॅकलीन फर्नांडिस विरुद्ध 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोप आहे. अभिनेत्रीवर फसवणुकीच्या रकमेचा फायदा घेतल्याचा आरोप आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला जामीन मंजूर
मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला जामीन मंजूर

नवी दिल्ली -200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात (money laundering case) बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पतियाळा हाऊस कोर्टातून मोठा दिलासा मिळाला आहे. जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) विरुद्ध 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोप आहे. या सुनावणीला जॅकलिन कोर्टात हजर होती. अभिनेत्रीवर फसवणुकीच्या रकमेचा फायदा घेतल्याचा आरोप आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने तिला नियमित जामीन मंजूर केला आहे. कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाण्यास तिला मनाई करण्यात आली आहे. मी माझ्या कामानिमित्त परदेशात जात राहते, पण मला परदेशात जाण्यापासून रोखले गेले. मला माझ्या कुटुंबीयांनाही भेटू दिले जात नाही. मी या सर्व गोष्टींसाठी तपास यंत्रणेला ईमेल केला होता, पण त्याचेही उत्तर आले नाही.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला जामीन मंजूर

अभिनेत्रीला का केले नाही अटक :ED च्या चौकशीवर जॅकलिन म्हणाली, 10 नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीत जॅकलिन कोर्टरूममध्ये आपला बचाव करताना म्हणाली होती, 'मी याप्रकरणी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य केले आहे. जॅकलिनकडून जामिनाचा अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र या जामिनाला ईडीकडून विरोध करण्यात आला होता. जामिन मिळाल्यास जॅकलिन देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करू शकते, असा आरोप ईडीने लावला.आम्ही आमच्या संपूर्ण आयुष्यात 50 लाख रुपये रोख पाहिले नाहीत, परंतु जॅकलिनने मौजमजेसाठी 7.14 कोटी रुपये उडवले. तिने प्रत्येक युक्ती वापरून पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे. कारण त्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसे आहेत. असे ईडीने कोर्टात म्हटले आहे. जॅकलिनला आतापर्यंत अटक का केली नाही? इतर आरोपी तुरुंगात आहेत, मग अशावेळी अभिनेत्रीला का अटक केली नाही असा सवाल कोर्टाने यावेळी ईडीला केला.

मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला जामीन मंजूर

प्रश्न विचारले तेव्हा दिली कबुली :200 कोटींच्या खंडणी प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात जॅकलिनचा उल्लेख आरोपी असा केला आहे. खंडणीतून मिळालेल्या पैशांचा फायदा जॅकलिनने घेतला, असे त्यात म्हटले गेले आहे. तर मी आरोपी नसून पीडित असल्याचे जॅकलिनने म्हटले आहे. जॅकलिनने तपासात कधीच सहकार्य केले नाही. पुरावे सादर केले तेव्हाच खुलासा केला. ती पुरावे आणि साक्षीदारांशी छेडछाड करू शकते. याप्रकरणी जेव्हा तिला इतर आरोपींसमोर बसवून प्रश्न विचारले गेले, तेव्हाच तिने कबुली दिली असेही ईडीने म्हटले आहे.

हे प्रकरण आहे : फोर्टिस हेल्थ केअरचे माजी प्रवर्तक शिवेंद्र मोहन सिंग यांची पत्नी आदित्य सिंग यांच्यासह अनेक हायप्रोफाईल लोकांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सुकेश चंद्रशेखरवर (Sukesh Chandrashekhar) गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे. सुकेशच्या संपर्कात असल्यामुळे अनेक बॉलीवूड अभिनेत्रीही चौकशीच्या कक्षेत आहेत. जॅकलिनवर सुकेश चंद्रशेखरने तिला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्याचा आरोप आहे.

Last Updated :Nov 15, 2022, 5:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details