महाराष्ट्र

maharashtra

Hotel Worker's Murder Near Shirdi : लोणीत डोक्यात दगड घालून हाॅटेल कामगार महिलेची निर्घृण हत्या

By

Published : Dec 7, 2021, 5:17 PM IST

Loni Murder

केडगाव (Kedgaon) येथील मूळची रहिवासी असलेल्या एका महिलेची राहाता (Rahata) तालुक्यातील लोणी (Loni) येथे निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. या घटनेने राहाता तालुक्यासह अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शिर्डी (अहमदनगर) -राहाता तालुक्यातील लोणी येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलेची निर्घृणपणे हत्या (Hotel Worker Brutally Murdered In Loni) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडालीय. लोणी पोलिसांसह फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

महिला केडगाव येथील रहिवासी
अहमदनगर शहरातील केडगाव येथील मूळची रहिवासी असलेली अंजना मोहिते ही 59 वर्षीय महिला लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलसमोर समोर असलेल्या हॉटेल पाकीजा येथे गेल्या पंधरा वर्षांपासून कामाला होती. हॉटेलमधील एका छोट्याशा खोलीत ती वास्तव्य करत होती. हॉटेल मालक सकाळी आठ वाजता हॉटेलवर आले असता त्यांनी तिला आवाज दिला. मात्र, काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी तिच्या खोलीच्या दिशेने जाऊन पाहिले असता, खोलीचा दरवाजा उघडा दिसला. आत डोकावले असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोहिते यांचा मृतदेह आढळून आला. हे बघून हॉटेल मालकाला मोठा धक्का बसला. त्यांनी याबाबत लोणी पोलिसांना कळवले असता, पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

गुन्हा दाखल, संशयित ताब्यात
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली. डोक्यात दगड घालून ही हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याबाबत अज्ञात आरोपींविरोधात लोणी पोलीस ठाण्यात (Loni Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फॉरेन्सिक पथकाच्या सहाय्याने धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह प्रवरा ग्रामीण रुग्णालयात (Pravara Rural Hospital) पाठवण्यात आला आहे. मात्र, या महिलेची हत्या कुणी व का केली असा प्रश्न निर्माण झाला असून, घटनेने राहाता तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details