महाराष्ट्र

maharashtra

The Kashmir Files Controversy : 'तेंव्हाच्या सरकारमध्ये भाजपाचेच लोक होते', काश्मीर फाईल्सवरून शरद पवारांचे टीकास्त्र

By

Published : Mar 20, 2022, 7:48 PM IST

Updated : Mar 20, 2022, 8:02 PM IST

काश्मिर फाईल्स चित्रपटावरून देशात राजकीय ( The Kashmir Files ) वातावरण तापले आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar Critisized BJP Over Kashmir File Movie ) यांनी भाजपावर टीकास्र सोडले आहे.

The Kashmir Files Controversy
The Kashmir Files Controversy

बारामती -काश्मिर फाईल्स चित्रपटावरून देशात राजकीय ( The Kashmir Files ) वातावरण तापले आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar Critisized BJP Over Kashmir File Movie ) यांनी भाजपावर टीकास्र सोडले आहे. चित्रपटात जो कालखंड आहे, तसेच ज्या दरम्यान काश्मीरमध्ये जे घडलं त्यावेळी देशाचं नेतृत्व कॉंग्रेसकडे नव्हतं. त्यावेळी विश्वप्रताप सिंग यांचे सरकार होते आणि भाजपचे लोकही त्या सरकारमध्ये होते, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. तसेच समाजातील सर्व घटक एकत्र आहेत. असं असताना पुन्हा समाजात दुरावा निर्माण होईल, असं लिखाण किंवा चित्रपट हे टाळलं पाहिजे, असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया

'देश एका विचाराने चाललेला आहे' -

काश्मिर फाईल्स चित्रपटावरून देशात सुरू असलेल्या वादावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'देश एका विचाराने चाललेला आहे. समाजातील सर्व घटक एकत्र आहेत. असं असताना पुन्हा समाजात दुरावा निर्माण होईल, असं लिखाण किंवा चित्रपट हे टाळलं पाहिजे. ज्या चित्रपटाबद्दल आता सांगितलं जाते आहे. त्यामध्ये कळत नकळत कॉंग्रेसवर एक दोष देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. कॉंग्रेसकडे सत्ता असताना हे घडलं आणि तेच याला जबाबदार आहेत, असं ध्वनित केलं जाते आहे, असे ते म्हणाले.

'फारुक अब्दुल्ला सत्तेतून दूर झाले होते' -

पुढे बोलताना ते म्हणाले, 'या सर्व बाबींचा आपण सखोल विचार केला पाहिजे. जो कालखंड आहे, ज्यामध्ये कश्मीरमध्ये जे काही घडलं जे आता दाखवलं जाते आहे. त्या कालखंडामध्ये देशाचं नेतृत्व कॉंग्रेसकडे नव्हतं. त्यावेळी विश्वप्रताप सिंग यांच्याकडे होतं. याबाबत आज आवाज उठवणारे भाजपचे लोक विश्वनाथ प्रतापसिंगांच्या सरकारमध्ये सहभागी झालेले होते. त्यानंतर या सर्व काळात देशाचे गृहमंत्री जे होते, तेही भाजपच्या पाठबळावरच होते आणि राज्यपाल राजवट होती. फारुक अब्दुल्ला सत्तेतून दूर झाले होते. जे राज्यपाल होते, ते कॉंग्रेसच्या विचारांचे नव्हते. त्यामुळे आज हा प्रश्न उचलून पुन्हा सामाजिक वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्या संबध कालखंडामध्ये या सर्वाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्याच्यामध्ये हा प्रश्न उपस्थित करणारे भाजपचे घटक हे पूर्ण सहभागी होते. त्यामुळे त्यांनी आता कारण नसताना हा विषय काढला हे योग्य नाही, असेही शरद पवार म्हणाले.

हेही वाचा -Sharad Pawar Reaction On MIM Praposal : एमआयएमबाबतच्या युतीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

Last Updated :Mar 20, 2022, 8:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details