ETV Bharat / city

Sharad Pawar Reaction On MIM Praposal : एमआयएमबाबतच्या युतीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

author img

By

Published : Mar 20, 2022, 7:33 PM IST

Updated : Mar 20, 2022, 8:11 PM IST

एमआयएमने महाविकास आघाडी सरकारमध्ये ( MIM Praposal To Enter In MVA Government ) सहभागी होण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar Reaction On MIM Praposal
Sharad Pawar Reaction On MIM Praposal

बारामती - एमआयएमने महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव ( MIM Praposal To Enter In MVA Government ) दिल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यात राजकारण चांगलेच तापले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ( NCP Chief Sharad Pawar ) यावर प्रतिक्रिया दिली आहे. कुणी कुठल्या पक्षासोबत जायचं हे ते स्वत: सांगू शकतात, परंतू ज्यांच्यासोबत जायचं आहे. त्या पक्षाने तरी होय म्हटलं पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.

प्रतिक्रिया

काय म्हणाले शरद पवार -

कुणी कुठल्या पक्षासोबत जायचं हे ते स्वत: सांगू शकतात, परंतू ज्यांच्यासोबत जायचं आहे, त्या पक्षाने तरी होय म्हटलं पाहिजे. हा खरं तर राजकीय निर्णय आहे. हा निर्णय महाराष्ट्रापुरता कुणी प्रस्तावित केला असला, तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारचा राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार राज्यातील नेत्यांना नाही. त्यामुळे महाराष्ट्रात गेली दोन दिवस जो एमआयएमबाबत बातम्या येत आहेत. तो पक्षाचा निर्णय नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. तसेच आमच्या दृष्टीने हा विषय संपला असून संजय राऊत काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.

'पुण्याच्या विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न' -

पुरंदर विमानतळासाठी एक जागा जवळपास निश्चित झालेली असून त्याला जवळपास सर्व विभागांनी मान्यता दिली आहे. त्या जागेच्या बाबत संरक्षण खात्याची काही मते आहेत. ही मते विमानतळाच्या अनुषंगाने दुर्लक्षित करता येत नाहीत. त्यामुळे यासंबंधीचा निर्णय घेण्यातप्रत आलेली यंत्रणा सध्या थांबली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने पुण्याच्या विमानतळाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा हा आमचा प्रयत्न आहे. यासाठी देशाचे संरक्षणमंत्री आणि संबंधित विभागातील यंत्रणांसोबत राज्य सरकारच्या प्रतिनिधींसह बैठक घेऊन निर्णय घ्यावा, हा आग्रह आम्ही दिल्लीत जाऊन करणार आहोत, असेही पवार म्हणाले.

हेही वाचा - Sudhir Mungantiwar Critisized Shivsena : 'एमआयएम भाजपची बी टीम असेल, तर शिवसेना ही काँग्रेसची बी टीम'

Last Updated : Mar 20, 2022, 8:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.