महाराष्ट्र

maharashtra

Pune Corona : पुण्यात कोरोना रुग्णांची सौम्य वाढ; शहरात दररोज 60 ते 70 नवे रुग्ण

By

Published : Jun 7, 2022, 10:33 PM IST

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईसह राज्यातील इतर शहरांमध्ये कोरोनाने पुन्हा हात-पाय पसरवायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येने राज्यातील रुग्णसंख्या ही वाढत असून, चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे.

pune corona
कोरोना फाईल फोटो

पुणे - महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईसह राज्यातील इतर शहरांमध्ये कोरोनाने पुन्हा हात-पाय पसरवायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येने राज्यातील रुग्णसंख्या ही वाढत असून, चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. पुणे शहरात ही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत आहे.

संजीव वावरे - आरोग्य अधिकारी, पुणे मनपा

शहरात वाढत आहे दरोरोज 60 ते 70 रुग्ण- तिसरी लाट ओसरल्यानंतर राज्यासह शहरात देखील निर्बंध मुक्त करण्यात आले होते. पण गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही शहरांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. शहरातही जी दररोज 20 ते 30 रुग्ण आढळून येत होते. तो आकडा आता वाढला असून, आता शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज 60 ते 70 रुग्णांची वाढ ही होत आहे. पुढच्या महिन्याभरात हा रुग्ण वाढीचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे यावेळी महापालिकेचे आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांनी दिली.

रुग्णांना सौम्य लक्षणे - शहरात जरी रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी घाबरून जाण्याची शक्यता नाही.आज जी रुग्णसंख्या वाढत आहे.त्यात रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण हे खूपच कमी आहे.आणि रुग्णांना की लक्षणे आहे ते लक्षणे अत्यंत सौम्य स्वरूपाचे लक्षणे आहे.महापालिकेच्यावतीने भविष्यात जरी रुग्णसंख्या वाढली तरी तशी तयारी करण्यात आली आहे.महापालिकेचे नायडू रुग्णालय,दळवी रुग्णालय तसेच औंध येथील रुग्णालयात तयारी करण्यात आली आहे.तसेच ऑक्सिजन ची तयारी देखील करण्यात आली आहे, असे देखील यावेळी वावरे यांनी सांगितले.

शहरात सध्या 335 रुग्ण हे ॲक्टीव - पुणे शहरात सध्या 335 रुग्ण हे ॲक्टीव असून 15 रुग्ण हे अॅडमिट आहेत. त्यातील फक्त 1 रुग्णालाच ऑक्सिजनची गरज भासली आणि आता एडमिशनचे प्रमाण हे 2 टक्क्यांपेक्षा कमी आहे, असे देखील यावेळी वावरे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details