महाराष्ट्र

maharashtra

Marathi sahitya Sammelan 2022 : 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे

By

Published : Jan 2, 2022, 1:52 PM IST

Updated : Jan 2, 2022, 4:32 PM IST

लातूरच्या उदगीरमध्ये होऊ घातलेल्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ( Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan ) अध्यक्षपदी एकमताने ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांची निवड करण्यात आली. उदगीर येथे झालेल्या महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

bharat sasane
bharat sasane

पुणे - लातूरच्या उदगीरमध्ये होऊ घातलेल्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ( Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan ) अध्यक्षपदी एकमताने ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांची निवड करण्यात आली. उदगीर येथे झालेल्या महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नाशिक येथे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. यावेळीच ९५ वे साहित्य संमेलन उदगीर (जि. लातूर) येथे होणार असल्याची घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली होती. तेव्हापासून 95 व्या साहित्यसंमेनाच्याअध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा सुरु होती. दरम्यान, 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे ( Marathi Sahitya Sammelan Selected Bharat Sasane ) यांची निवड करण्यात आली आहे.

आणि मराठी साहित्यविषयी...

भारत सासणे यांच्याशी संवाद साधताना प्रतिनिधी

निवडीनंतर 'ईटिव्ही भारत'शी बोलताना नवनिवर्वाचित अध्यक्ष भारत सासणे म्हणाले की, "साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषण हा सर्वात महत्त्वाचा विषय असून अनेक अध्यक्षांच्या भाषणांची आजही चर्चा होत आहे. अध्यक्षीय भाषणाचा आत्ता तरी कोणताही विचार केलेला नाही. मात्र, स्थानिक प्रश्न व्यतिरिक्त जिथं जिथं मराठा माणूस आहे. मग तो राज्याबाहेर असो त्यामुळे मराठी आणि मराठी साहित्यविषयी वैश्विक मुद्द्यांना आपण समजून घेऊ यावर माझा भर असेल."

राजकारणाबद्दल देखील बोलावंच लागणार

साहित्य संमेलनात आजकाल साहित्याविषयी कमी पण राजकारणाविषयी जास्त बोललं जातं आहे. यावरती विचारले असता सासणे यांनी सांगितले की, "राजकीय भाष्य हा काही व्यर्ज असलेला भाग नाही. कारण माणूस जेव्हा जगत आहे तेव्हा त्याच्या भोवताली राजकारण हे आलंच आहे. मराठी माणूस हा नाकापर्यंत राजकारणात बुडालेला आहे. राजकीय भाष्य जे काही आहे, त्या माणसाच्या अस्तित्वाबद्दल बोलत असताना राजकारणाबद्दल देखील बोलावंच लागणार आहे, असं माझं स्वतःच मत असल्याचेही त्यांनी म्हटलं."

हेही वाचा -Marathi Sahitya Sammelan 2022 : ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांची 'ही' ग्रंथसंपदा आहेत प्रसिद्ध, वाचा सविस्तर...

Last Updated : Jan 2, 2022, 4:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details